Corona Update : दोन ते अडीच वर्षे अख्ख्या जगाला छळणाऱ्या कोरोना (Corona) विषाणूबाबत आज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठी घोषणा केली आहे. कोविडबाबत डब्ल्यूएचओने सांगितले की, कोविड ही आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही. आपत्कालीन समितीच्या पंधराव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि, याचा अर्थ असा नाही की कोविड-19 चा धोका संपला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस म्हणाले, काल आपत्कालीन समितीची बैठक झाली. कोविड-19 च्या जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून जगाला वगळण्यात यावे, असे या बैठकीत सुचविण्यात आले. त्यानंतर घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे.
तरीही सावध रहा
WHO ने जाहीर केले आहे की कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. तथापि, याचा अर्थ असा नाही की कोविड-19 हा जागतिक आरोग्याचा धोका संपला आहे. गेल्या आठवड्यात दर तीन मिनिटाला एका व्यक्तीचा COVID-19 मुळे मृत्यू झाला आहे. सध्या या विषाणूपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
WHO ने अहवाल दिला की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले आणि एकही मृत्यू झाला नव्हता.