Corona : गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 9 हजार 531 नवीन रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत. या कालावधीत 36 लोकांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे, तर 11,726 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 97 हजार 648 आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संसर्गाची एकूण 4,43,48,960 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी 4,37,23,944 लोक झाले आहेत. तर 5,27,368 मृत्यू झाले आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या साथीच्या संदर्भात कडक इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांनी गुरुवारी सांगितले की, ‘कोरोना आपल्यामध्ये नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही’. आम्हाला अजूनही स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांचा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा पुन्हा एकदा कोरोनामुळे (Corona) होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. भारतामध्येच (India) कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
कोविड-19 सोबत जगायला शिकण्याचा अर्थ असा नाही की आपण कोरोना अस्तित्वात नाही असे भासवतो. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करत राहिले पाहिजे.” जगभरात चार आठवड्यांत कोविड-19-संबंधित मृत्यूंमध्ये 35 टक्के वाढ झाली आहे.
तसे पाहिले तर मागील अडीच वर्षांपासून कोरोना जगभरात थैमान घालत आहे. सुरुवातीला हा आजार नवीन होता. लोकांना काहीही माहित नव्हते. त्यामुळे आजार वेगाने पसरला. नंतर मात्र, जनजागृती आणि लसीकरणामुळे हा घातक आजार बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. तरी देखील काही देशात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.