Corona : नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या तर कमी होऊ लागली आहेच, पण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशात आज म्हणजेच शनिवारी 1082 नवीन कोरोना रुग्ण आढळले. शनिवारी देशात कोविड-19 ची (Covid 19) 1,082 नवीन प्रकरणे समोर आल्याने, संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,46,59,447 झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15,200 वर आली आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,30,486 झाली आहे. या सात रूग्णांमध्ये दोन लोकांचाही समावेश आहे, ज्यांची नावे केरळने जागतिक महामारीमुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या यादीत समाविष्ट केली आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पाच रुग्णांपैकी दिल्लीमध्ये दोन आणि महाराष्ट्र, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आकडेवारीनुसार, उपचाराधीन प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी 0.03 टक्के आहेत. कोविड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recovrey Rate) प्रमाण 98.78 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,13,761 वर पोहोचली असून मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत (Corona Vaccination) आतापर्यंत 219.71 कोटी डोस देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात या प्रकरणांची संख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, संक्रमितांची संख्या 2 कोटी आणि 23 जून 2021 रोजी ती 3 कोटी पार केली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.
- Must Read : Coronavirus In China : बाब्बो.. ‘या’ शहरांत पुन्हा लॉकडाऊन; ‘इतक्या’ लोकांची होणार तपासणी; जाणून घ्या..
- Corona New Variant: ‘हा’ कोरोनाचा नवा प्रकार वेगाने होतोय संक्रमित; काळजी घेणे गरजेचे