मुंबई – गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूच्या (Corona Virus) रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 69 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 681 झाली आहे.
आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यातील संसर्गाची प्रकरणे 78,75,620 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,47,827 वर पोहोचली आहे. गुरुवारी राज्यात संसर्गाचे 103 नवीन रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव, नंदुरबार, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा येथे संसर्गाचा एकही रुग्ण नाही.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
तर दुसरीकडे 132 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, एकूण संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 77,27,112 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. मुंबईत संसर्गाची 44 नवीन प्रकरणे आढळून आली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, शुक्रवारी राज्यातील कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूचे हे एकमेव प्रकरण आहे. कोविड-19 मृत्यू दर 1.87 टक्के आहे. गुरुवारी संध्याकाळपासून कोविड-19 साठी 23,967 नमुने तपासण्यात आले आहेत.