दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आता तर दररोज 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातील राज्यांतही कोरोनाचा वेग वाढला आहे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यात परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. तामिळनाडू मध्ये आजही 23 हजारांपेक्षा जास्त तर राजधानी चेन्नई शहरात 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या वाढत चाललेल्या कोरोनास काही प्रमाणात अटकाव व्हावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यात एक दिवसाच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणाच केली आहे.
राज्य सरकारने 23 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय येथील सरकारने घेतला आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारने कोरोना संसर्गाच्या तपासणीच्या खर्चात मोठी कपात केली आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने नवीन किमतींबाबत आदेश जारी केला असून त्याअंतर्गत आरटी-पीसीआर चाचणी शुल्कात सुमारे 40 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याच वेळी अँटीजेन चाचणीचा खर्च 200 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
नवीन निर्देशांनुसार, आता दिल्लीत कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी 300 रुपयांमध्ये केली जाईल. आतापर्यंत या तपासणीसाठी कमाल 500 रुपये आकारले जात होते. त्याचप्रमाणे विविध खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये अँटीजेन चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात होते. अनेक प्रयोगशाळा 300 ते 400 रुपयांमध्ये अँटीजेन चाचणी करत होत्या, परंतु नवीन आदेश जारी केल्यानंतर आता केवळ 100 रुपयांमध्ये अँटीजेन चाचणी करता येणार आहे.
आता फक्त 300 रुपयांत होणार कोरोना तपासणी; पहा, कोणत्या राज्याने केल्यात तपासणीचे दर कमी
निवडणूक राज्यासह ‘या’ 6 राज्यात टेन्शन देतोय कोरोना; पहा, काय इशारा दिलाय आरोग्य विभागाने