Corn Farming Tips: ‘प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ज्ञांची’ या लेखनमालेमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी अशी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील मजकूर आम्ही यामध्ये प्रसिद्ध करत आहोत. यावर आपणास काहीही प्रश्न किंवा मार्गदर्शन हवे असल्यास टीम कृषीरंगच्या मोबाइल नंबरवर टेक्स्ट मेसेज किंवा व्हाटस्अॅप मेसेज करावा. यामध्ये सर्व पिकांची आणि पशुपालन याबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. ही माहिती वाचण्यासाठी रहा टीम कृषीरंग समवेत..
प्रश्न: मका कोणत्या हंगामात घ्यावयाचे पीक आहे?
उत्तर: मका हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते.
प्रश्न : मका पिकास जमीन कोणत्या प्रकारची असावी ?
उत्तर: पिकास मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी जमीन असावी.
प्रश्न: मका पिकास कोणत्या प्रकारचे हवामान आवश्यक असते?
उत्तर : मका हे उष्ण, समशितोष्ण आणि थंड अशा विविध हवामानात येणारे पीक आहे.
प्रश्न : मकाउगवणीसाठी किती तापमानाची आवश्यकता असते?
उत्तर : मका पिकाची उगवण होण्यासाठी १८ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
प्रश्न : मका पेरणीच्या वेळी जास्त थंडी किंवा १८ सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास कायहोते ?
उत्तर : मका पेरणीच्या वेळी कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोंगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.
प्रश्न : मका पेरणीच्या वेळी जास्त थंडी किंवा १८” सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास काय होते ?
उत्तर: मका पेरणीच्या वेळी कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोगांच्या प्रादुर्भाव होऊन उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.
प्रश्न : मका पिकाचे उत्पादन कोणत्या हंगामात अधिक येते ?
उत्तर : खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात २० ते २५ टक्के अधिक उत्पादन येते.
प्रश्न : मका पिकाची चांगली वाढ होणेसाठी किती तापमान आवश्यक आहे?
उत्तर : मका पिकाची उत्कृष्ठ वाढ व विकास होण्यासाठी २५ ते ३० अंश आवश्यकता असते.सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असावी.
प्रश्न : जास्त तापमानाचा मका पिकावर काय परिणाम होतो?
उत्तर : ३५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असल्यास परागीभवनावर परिणाम होऊन उत्पादनात घट येते.
प्रश्न : मका पीक घेण्यासाठी जमिनीचा सामु किती असावा?
उत्तर : मका पीक घेण्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
प्रश्न : मका पीक घेण्यासाठी कशा प्रकारची पूर्वमशागत करावी ?
उत्तर : १ खोल नांगरटव २ कुळवाच्या पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी. प्रश्न जमिनीच्या नांगरटीचा मका पिकावर काय परिणाम होतो? उत्तर : जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
प्रश्न : जमिनीच्या खोल नांगरटीचा पिकास काय फायदा होतो?
उत्तर : पूर्व पिकाची धसकटे, अवशेष काडीकचरा इ. खोल नांगरटीमुळे जमिनीस गाडल्यानेजमिनीत सेंद्रीय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो तसेच सुप्तावस्थेतील किडींचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
- Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
- Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
- Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
- Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
- Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट
प्रश्न : मका पिकांस किती सेंद्रीय खतांची आवश्यकता असते ?
उत्तर : मका पिकास हेक्टरी १०-१२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताची गरज असते.
प्रश्न : मका पिकास सेंद्रीय खते कशी व केंव्हा द्यावीत ?
उत्तर : मका पिकांस चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत कुळवाच्या शेवटच्या पाळीच्या वेळी जमिनीत मिसळावे.
प्रश्न : मका पिकाची हंगामवार पेरणी कोणत्या महिन्यात करावी?
उत्तर : मका पिकाची खरीप हंगामासाठी जून-जुलै, रबी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर वउन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी.
प्रश्न : मका पिकास बीजप्रक्रिया कशी करावी?
उत्तर : अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे मकाबियाणास चोळून बीजप्रक्रिया करावी.
प्रश्न : मका पिकांतील पक्वता कालावधीनुसार गट कोणते ?
उत्तर : मका पिकाचे कालावधीनुसार उशीरा पक्व होणारे, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारे, लवकर पक्व होणारे व अति लवकर पक्व होणारे वाण असे गट पडतात.
प्रश्न : मका पिकाचे वापरानुसार गट कोणते ?
उत्तर : मका पिकाचे साधा मका, गुणात्मक प्रथिनयुक्त मका, चाऱ्यासाठी मका, बेबीकॉर्न, मधुमका द पॉपकॉर्न असे गट पडतात.
प्रश्न : उशीरा पक्व होणाऱ्या मका पिकाचा कालावधी किती दिवस असतो?
उत्तर : उशीरा पक्च होणार्या मका पिकाचा कालावधी १०० ते ११० दिवसांचा असता.
प्रश्न : मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या मका पिकाचा कालावधी किती दिवसांचा असतो?
उत्तर : मध्यम कालावधीत पक्व होणार्या मका पिकाचा कालावधी ९० -१०० दिवस असतो.
प्रश्न : लवकर पक्च होणाऱ्या मका वाणाचा कालावधी किती असतो?
उत्तर : लवकर पक्व होणार्या मका वाणाचा कालावधी ८५ ते ९० दिवस असतो.
प्रश्न : अति लवकर पक्व होणाऱ्या मका वाणांचा कालावधी किती असतो?
उत्तर : अति लवकर पक्व होणाऱ्या मका वाणांचा कालावधी ८० ते ८५ दिवसांचा असतो.
प्रश्न : मका पिकाची पेरणी कशा पध्दतीने करावी?
उत्तर : जिरायती मक्याची पेरणी पाभरीने किंवा टोकण पध्दतीने करता येते. पाभरीने पेरतांनाबियाणे जास्त खोल पेरू नये.
प्रश्न : पेरणीचे अंतर काय असावे?
उत्तर : मका पेरणीचे अंतर उशिरा व मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांसाठी ७५ x २०-२५ से.मी. व कमी कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या वाणांसाठी ६० x २० सें.मी. असावे.
प्रश्न: मका पेरणीसाठी किती बियाणे वापरावे ?
उत्तर : मका पेरणीसाठी हेक्टरी १५-२० किलो बियाणे वापरावे.
प्रश्न : मका पिकास रासायनिक खताच्या मात्रा किती द्याव्यात ?
उत्तर : उशिरा व मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या मका पिकास १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश हेक्टरी द्यावे.
प्रश्न : रासायनिक खते कशा पध्दतीने द्यावीत ?
उत्तर : पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र व पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावा.
प्रश्न : मका पिकास सुक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे का ?
उत्तर : जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.
प्रश्न : मका पिकातील तणांचा बंदोबस्त कसा करावा?
उत्तर : मका पिकाच्या पेरणी नंतर जमीनीत ओलावा असताना अॅट्राझीन हे तणनाशक हेक्टरी२ ते २.५ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्यानंतरआवश्यकतेनुसार खुरपणी करावी.
प्रश्न : मका पिकाचे सुरवातीच्या काळात काय काळजी द्यावी ?
उत्तर : मका पिकाचे पक्षापासून, जनावरांपासून संरक्षण करणे आवश्यक असते.
प्रश्न : मका पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?
उत्तर : रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांनी व खरीपांत जरूरीनुसार पाणी द्यावे.
प्रश्न : मका पिकाच्या पाणी देण्यासाठी संवेदनशील अवस्था कोणत्या ?
उत्तर : मका पिकाची वाढीची अवस्था (पेरणीनंतर२० ते ४० दिवस) फुलोरा अवस्था (पेरणीनंतर ४० ते ६० दिवस) व दाणे भरण्याची अवस्था (पेरणीनंतर ७० ते ८०दिवस) हया संवेदनशील अवस्था आहेत.
प्रश्न : मका पिकावरील प्रमुख किडी कोणत्या?
उत्तर: मका पिकावर प्रमुख किडींमध्ये खोडकिड, लष्करी अळी, मावा, तुडतुडे इ. प्रादुर्भावहोता.
प्रश्न : मका पिकावरील प्रमुख रोग कोणते ?
उत्तर : मका पिकावर प्रामुख्याने करपा व तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
प्रश्न : मका पिकाचे सरासरी उत्पादन किती येते ?
उत्तर: मका पिकाचे संकरित वाणांचे हेक्टरी ७० ते ८० किंविटल व संमिश्र वाणांचे ५० ते ५५ विंवटल खरीप हंगामात उत्पादन येते. रब्बी हंगामात १५ ते २० टक्के उत्पादनात वाढहोते.
प्रश्न: मका पिकातील उशीरा पक्व होणारे वाण कोणते?
उत्तर: मका पिकातील बायो ९६८१, एच.क्यु. पी.एम. १. एच.क्यु. पी.एम.५, आफ्रिकन टॉल हेउशीरा पक्व होणारे वाण आहेत
प्रश्न: मका पिकातील मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण होणते ?
उत्तर : मका पिकातील बायों ९३७, राजर्षि, शक्ती-१ हे मध्यम कालावधीत पक्व होणारे संकरित वाण आहेत व मांजरी, करवीर, नवज्योत इ. संमिश्र वाण आहेत.
प्रश्न : मका पिकातील लवकर पक्व होणारे वाण कोणते?
उत्तर : पुसा संकर मका १ व २ हे संकरित आणि पंचगंगा विवेक संकुल मका-११, किरण इ. संमिश्र वाण लवकर पक्व होतात.
प्रश्न : अति लवकर पक्व होणारे वाण कोणते?
उत्तर : विवेक संकरित मका-२१, विवेक संकरित मका-२७, व्ही.एल. मका-४२ हे अति लवकर पक्व होणारे वाण आहेत.
प्रश्न : मधुमका किंवा स्विटकॉर्न म्हणजे काय?
उत्तर : मधुमका किंवा स्विटकॉर्न म्हणजे गोड मका होय. यामध्ये इतर मक्यापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते.
प्रश्न : मधुमका व साधा मका यात काय फरक आहे ?
उत्तर : साध्या मक्यामध्ये साखरेचे प्रमाण २-३ टक्के आहे व मधुमक्यामध्ये साखरेचे प्रमाण ५-११ टक्के इतके असते.
प्रश्न : मधुमक्याचा वापर कशाकरिता करतात ?
उत्तर : मधुमका प्रामुख्याने कणसे भाजून अथवा उकडून खाण्यासाठी व प्रक्रियायुक्त उत्पादनासाठी करतात.
प्रश्न : मधुमक्याची काढणी केंव्हा करावी?
उत्तर : पक्व होणाऱ्या मधुमक्यामध्य साखरेचे प्रमाण काही कालावधीकरीताच अधिक असते. नंतर हे झपाटयाने कमी होत जाते त्यामुळे कणसे दुग्धावस्थेत असतांनाच काढणे महत्वाचे असते.
प्रश्न : मधुमका पेरणीसाठी बियाणे किती वापरावे?
उत्तर : मधुमका पेरणीसाठी एकरी ४ किलो बियाणे वापरावे.
प्रश्न : मधुमका पेरणीसाठी विलगीकरण अंतर आवश्यक आहे का?
उत्तर : मधुमका पेरणीकरीता आसपास २५० फुटापर्यंत इतर जातीचा मका पेरू नये.
प्रश्न : मधुमक्याच्या जाती कोणत्या ?
उत्तर : मधुमक्याच्या माधुरी, प्रिया, स्विटकॉर्न-९, विन ऑरेंज स्विटकॉर्न इ. जाती आहेत.
प्रश्न : बेबीकॉर्न म्हणजे काय?
उत्तर : बेबीकॉर्न म्हणजे मक्याच्या कणसातून केसर बाहेर येताच काढलेले अफलित कोवळी कणसे.
प्रश्न : बेबीकॉर्नचा उपयोग कशासाठी करतात ?
उत्तर : बेबीकॉर्नचा उपयोग मुख्यत्वे पंचतारांकीत हॉटेल मध्ये केलाजातो. त्यापासून सूप लोणचे, भजी, वडे, भाजी इ. पदार्थ तयार करतात.
प्रश्न : बेबीकॉर्नचे पेरणीचे अंतर किती ठेवावे ?
उत्तर : बेबीकॉर्नसाठी पेरणीचे अंतर ४५ x १८ किंवा ६० x १५ से.मी. ठेवावे.
प्रश्न : बेबीकॉर्न पेरणीसाठी किती बियाणे लागते?
उत्तर : बेबीकॉर्न पेरणी करणेसाठी ५०-६० किलो हेक्टरी बियाणे लागते.
प्रश्न : बेबीकॉर्न मक्याच्या जाती कोणत्या?
उत्तर : एच.एम.४, व्ही.एल. मका-४२, व्ही. एल. बेबीकॉर्न-१ इ. बेबीकॉर्न मक्याच्या जाती आहेत.
प्रश्न: पॉपकार्न म्हणजे काय?
उत्तर : लायांसाठीच्या मक्याला पॉपकॉर्ने मका म्हणतात.
प्रश्न : पॉपकॉर्न मक्याच्या जाती कोणत्या ?
उत्तर : अंबर पॉपकार्न, पॉपकॉर्न-११, व्ही.एल. अंबरपॉपकॉर्न आणि पर्ल पॉपकॉर्न इ. पॉपकॉन् मक्याच्या जाती आहेत.
प्रश्न : मक्यावरीत खोड किडीचे नियंत्रण कसे करावे ?
उत्तर : १) उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी निंबोळी अर्क ५ टक्केची फवारणी करावी. २) मका-चवळी (२:१) आंतरपीक पध्दतीचा वापर करावा.
प्रश्न : मका पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यावर आढळणाऱ्या किडी कोणत्या ?
उत्तर:
पिक कालावधी | आढळणाऱ्या किडी |
उगवणीनंतर १ महिन्यापर्यंत | खोड कीड, मावा. तुडतुडे, फुलकिडे, देठ कुरतडणारी आळी |
१-२ महिन्यांप्रयंत | मावा, तुडतुडे, नाकतोडे, लष्करी आळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, केसाळ अळी, करडे सोंडे |
२-३ महिन्यांपर्यंत | मावा, तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, करडे सोंडे, कणसे पोखरणारी अळी व केशर खाणारी अळी |
३ महिने ते काढणी पर्यंत | मावा, तुडतुडे, पाने गुंडाळणारी ळी, करडे सोंडे, कणसातील हिरवी अळी, तपकिरी अळी व केसाळ अळी |
प्रश्न : मक्याची कणसे पोखरणारा अळीचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर : किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास मिथिल पॅरॉथिऑन २ टक्के या किटकनाशकाची धुरळणी हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात वारा शांत असतांना करावी किंवा क्लोरोपायरिफ़ॉस २० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फ़वारावे.
प्रश्न : मावा, तुडतुडे या किडींचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर : मका पिकावर लेडी बर्ड भुंगा, क्रायसोपर्ला यासारख्या मित्र किडींची जोपासना करावी. प्रादुर्भाव असल्यास डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फ़वारणी करावी.
प्रश्न : मका पिकावरील करपा या रोगांचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर : करपा रोगाच्या नियंत्रणासाठी झायनेब ७५ डब्ल्यु.पी १५०० ते २००० ग्म प्रति ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : [email protected]
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 08830113528 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा.. *(टायपिंग चूक झाल्यास क्षमस्व. त्याबद्दल प्रतिक्रिया लिहून सहकार्य करावे, ही वाचकांना नम्र विनंती)