Take a fresh look at your lifestyle.

Sunday special recipe : घराच्या घरीच तयार करा लज्जतदार चीज डोसा.. अगदी सोप्या पद्धतीने 

अहमदनगर : डोसा ही अशी डिश आहे जी जवळपास सगळ्यांनाच आवडते. दक्षिणेची (South) ही डिश जवळपास सर्वत्र प्रसिद्ध (Famous) आहे. त्याचबरोबर डोसाचे अनेक प्रकार रस्त्यापासून ते रेस्टॉरंटपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात चीज डोसाचा (Cheez Dosa) समावेश आहे. चीज डोसा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडतो. जर तुम्हाला घरी डोसा बनवायला आवडत असेल तर ही चीज डोसाची रेसिपी (Recipe) एकदा नक्की करून बघा. हे खाल्ल्यानंतर प्रत्येकजण साधा मसाला डोसा खाणे विसरेल. चला तर मग जाणून घेऊ या चीज मसाला डोसा कसा बनवायचा.

Advertisement

चीज डोसासाठी साहित्य : चीज मसाला डोसा बनवण्यासाठी डोशाचे पीठ तयार करा. सोबत एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून किसलेले चीज, काळी मिरी, लोणी, ओरेगॅनो, चवीनुसार मीठ.

Advertisement

चीज मसाला डोसा कसा तयार करायचा : चीज मसाला डोसा तयार करण्यासाठी प्रथम डोसा पॅन मध्यम आचेवर गरम करा. नंतर त्यावर थोडं तेल लावून पसरवा. ते पुरेसे गरम झाल्यावर गॅस कमी करा आणि नंतर डोसा पिठ तव्यावर पसरवा. स्पॅटुलाच्या मदतीने ते चांगले गुळगुळीत करा. आता डोसा मंद आचेवर एक ते दोन मिनिटे शिजू द्या. आता या डोस्यावर चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला.

Advertisement

कांदे आणि टोमॅटोसह किसलेले चीज घाला. त्याच बरोबर डोस्यावर काळी मिरी घाला. चीज बुडताना वितळण्यास सुरवात होईल. नंतर बटर लावा. आता डोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा. लक्षात ठेवा गॅसची ज्योत मंद ठेवावी. नाहीतर डोसा जळतो. आता डोसा स्पॅटुलाच्या मदतीने इच्छित आकारात फोल्ड करा. स्वादिष्ट चीज डोसा तयार आहे. तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबरासोबत सर्व्ह करू शकता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply