Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सावधान ! तळलेलं तेल पुन्हा वापरत आहात, तर थांंबा.. आधी जाणून घ्या याचे गंभीर दुष्परीणाम..

स्वयंपाकाचे वापरलेले तेल अल्डेहाईड सारखे अनेक विष बाहेर टाकते. जे हृदयासाठी हानिकारक असतात आणि अल्झायमर, स्ट्रोक, कर्करोग, पार्किन्सन आणि यकृताच्या आजारांना निमंत्रण देतात.

मुंबई : ऋतू कोणताही असला तरी घरात अन्न बनवण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. आपण घरी भजी, वडे, पुरी किंवा पापड तळतांना, कुरड्या तळतांना किंवा चटकदार पदार्थ बनवण्यासाठी आपण कडईत जास्तीचं तेल टाकतो.  मात्र अन्न पदार्थ बनवल्यानंतर जास्त झालेलं तेल आपण नंतरच्या वापरासाठी काढून ठेवतो. परंतू एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे अनेक गंभीर दुष्परीणाम होतात.

Advertisement

 

Advertisement

स्वयंपाक करताना एकदा वापरलेले तेल पुन्हा कधीही वापरू नये. कारण तेल खराब होण्याची प्रक्रीया सुरू झालेली असते तर तेलामध्ये ट्रान्स-फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढण्यास सुरूवात होते. त्यामुळे तळलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून विशेषतः थंड तेल पुन्हा गरम करणे टाळायला हवे, कारण यात स्मोकिंग पॉईंट्सचे प्रमाण खूप कमी असते. मात्र मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑइल  परत एकदा वापरता येतात, परंतू ते टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.

Advertisement
त्यामुळे एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरताना ते फ्री रॅडिकल्स तयार करू शकते . त्यामुळे ते तेल दीर्घकाळ वापरणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तर हे फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. याशिवाय अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागते. तसेच यामुळे चांगले कॉलेस्टेरॉल कमी होऊन वाईट कोलेस्टेरॉलची समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

 

Advertisement

स्वयंपाकाचे वापरलेले तेल अल्डेहाईड सारखे अनेक विष बाहेर टाकते. जे हृदयासाठी हानिकारक असतात आणि अल्झायमर, स्ट्रोक, कर्करोग, पार्किन्सन आणि यकृताच्या आजारांना निमंत्रण देतात. याबरोबरच पुन्हा वापरलेल्या तेलामुळे गॅसची समस्या, पोटात जळजळ होणे निर्माण होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा रेस्टॉरंटमध्ये एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्याने अनेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात.

Loading...
Advertisement

..मग या शिल्लक राहिलेल्या तेलाचे काय करावे?

Advertisement

स्वयंपाकाच्या वेळी आवश्यक आहे तेवढेच तेल वापरण्याचा प्रयत्न करावा. तसेच तेल शिल्लक राहिले तर ते इतर कारणांसाठी वापरावे. त्यामध्ये घराचे दरवाजे, कुलूप गंजू नये यासाठी या शिल्लक तेलाचा वापर करता येईल. तसेच  वापरलेले तेल आणि व्हिनेगरच्या मिश्रण एकत्र करून लाकडी फर्निचर पॉलिश करण्यासाठी वापरता येईल.

Advertisement
अन्न पदार्थ तळण्यासाठी विशेषतः रिफाईंड तेलाचा वापर करायला हवा. तसेच मोहरी, सोयाबिन तेल, शेंगदाना तेल किंवा तिळाचे तेल वापरायला हवे.
तळण्यासाठी भाजी, तूप, खोबरेल तेलाचा वापर करणे ठीक आहे, मात्र या तेलाचा वापर डीपफ्रायसाठी करू नये, असा सल्ला डॉक्टर देतात.
Advertisement

Leave a Reply