Congress : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणात (Uttar Pradesh Politics) जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण, महापालिका निवडणुका (Municipal Corporation Election In Uttar Pradesh) जवळ आल्या आहेत. काँग्रेसने (Congress) संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे आता नव्या प्रदेश कार्यकारिणीची स्थापना होणार आहे. यासाठी दिल्लीत आलेले उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ब्रिजलाल खबरी हे येथे वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
यूपी काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. यासोबतच ज्येष्ठ नेत्यांबरोबरच तरुण चेहऱ्यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. जुन्या राज्य कार्यकारिणीत 100 हून अधिक जणांचा समावेश होता. आता मात्र यामध्ये बदल होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. या कार्यकारिणीत कुणाला संधी मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसने 1 ऑक्टोबर रोजी माजी राज्यसभा सदस्य ब्रिजलाल खबरी यांना उत्तर प्रदेश अध्यक्ष केले होते.
उत्तर प्रदेशात सध्या भाजप (BJP) सरकार आहे. येथे अन्य विरोधी पक्ष कमकुवत दिसत आहेत. काँग्रेसची तर परिस्थिती आधिक खालावलेली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. आता या निवडणुकांसाठी वेगळ्या पद्धतीने नियोजन केले जात आहे. काँग्रेस बरोबरच बसपा, समाजवादी पार्टी या प्रमुख विरोधी पक्षांनीही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत. त्यांनी कार्यभारही स्वीकारला आहे. या घडामोडींचाही आगामी काळातील राजकारणावर व निवडणुकांवर परिणाम जाणवणार आहे.
- Must Read : Uttarakhand Election : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव.. भाजपला पडलाय ‘हा’ मोठे संकट..?
- Congress President: २४ वर्षानंतर अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसला मिळाला हा गांधी घराण्याबाहेरील नवा चेहरा
- Nitish Kumar Vs PK : नितीशकुमार यांचे भाजपबाबत मोठे विधान; विरोधकांचा ‘तो’ दावाही फेटाळला
- Congress : काँग्रेसमध्ये खळबळ..! मुख्यमंत्रीपदासाठी ‘त्या’ राज्यात राजकारण जोरात.. जाणून घ्या, राजकीय अपडेट..