मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई बीएमसीसाठी (Mumbai BMC) सप्टेंबरनंतर निवडणूक (BMC Election) होणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) निर्णयानंतर काँग्रेस (Congress) ने एकट्याने निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.तर शिवसेनेने पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे.
यंदा होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे देशातील सर्वच पक्षांच्या नजरा असतील.आशिया खंडातील या समृद्ध महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आता प्रत्येक पक्ष आपापल्या निवडणुकीच्या फॉर्म्युल्यासह रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करत आहे.निवडणुकीसाठी, मुंबईकरांना 200 युनिट वीज मोफत, 20 हजार लिटर पाणी मोफत आणि महिलांना बसमध्ये मोफत प्रवासासारख्या सुविधा दिल्या जातील.. आशी घोषणा आप कडून करण्यात आली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम आहे आणि त्यामुळे ते काँग्रेसचा मुद्दा चोरून जनतेत जाऊन मतांचे राजकारण करत आहेत निवडणूक ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपरवर व्हावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना, वार्षिक मुंबई बीएमसीचे बजेट 42 हजार कोटींहून अधिक आहे, तर मुंबई बीएमसीच्या बँकेत 70 हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.
मुंबईत कोणत्या पक्षाच्या किती जागा
गेल्या निवडणुकीत BMC च्या एकूण 227 जागा होत्या, त्यापैकी
शिवसेना –97
भाजपा–83
काँग्रेस –29
राष्ट्रवादी-8
समाजवादी पक्ष–6
मनसे-1
पण आता मुंबई बीएमसीच्या 9 जागा वाढल्या आहेत म्हणजेच या वर्षी सप्टेंबरनंतर होणाऱ्या मुंबई बीएमसीच्या 236 जागा होणार आहे.