Congress । विधानसभेपूर्वी काँग्रेस देणार भाजपाला मोठा धक्का, आखली ‘ही’ रणनीती

Congress । अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेपूर्वी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणते नेते पक्षांतर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच काही नवीन समीकरणे जुळताहेत का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणूकीतील भाजपाच्या कामगिरीनंतर देशात एक ‘फेक नरेटिव्ह’ हा शब्द सतत ऐकायला मिळत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर अबकी बार 400 पार केल्यानंतर घटना बदलणार अशी वक्तव्य केली होती. त्यानंतर भाजपाने असे काही होणार नसल्याचा दावा केला. पण कॉंग्रेसने हा प्रचाराचा मुद्दा बनविला. भाजपाने कॉंग्रेसने घटना बदलणार असे फेक नरेटिव्ह पसरवले असल्याने आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाही असा दावा भाजपा नेत्यांनी करायला सुरुवात केली. पण आता प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाचे फेक नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी नवीन टिमच जाहीर केली आहे.

सत्ताधारी पक्षाकडून ‘फेक नेरेटिव्ह’ पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले असून आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो,व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवित आहे. जनतेला सत्य समजावे आणि सत्ताधाऱ्यांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 15 नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नेत्यांचा असणार समावेश

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा यांना आता कॉंग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची जबाबदारी दिली आहे. यांच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे दिली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि संघटक नाना गावंडे यांनी दिली आहे.

Leave a Comment