Congress Second List : काँग्रेसची दुसरी यादीही जाहीर; ‘या’ माजी मु्ख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट

Congress Second List : लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी (Congress Second List) जाहीर केली. या यादीत सहा राज्यांसाठी 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आसाम 12, गुजरात 7, मध्य प्रदेश 10, राजस्थान 10, उत्तराखंड 3 आणि दमन दीवमधून एका उमेदवाराला तिकीट देण्यात आले. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल म्हणाले, की लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही तिकीट देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना जालौर मतदारसंघातून तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांन जोरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत जवळपास 60 नावांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर 40 पेक्षा जास्त नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?

Congress Second List

याआधी 8 मार्च रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.  या पहिल्या यादीत छत्तीसगड सहा, कर्नाटक सात, केरळ 16, लक्षद्वीप एक, मेघालय दोन, नागालँड एक, सिक्कीम एक, तेलंगाणा चार आणि त्रिपुरा राज्यातून एका अशा एकूण 39 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी, तिरुवनंतपूरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल या दिग्गज नेत्यांना तिकीट मिळाले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 15 उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहेत तर 24 उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक प्रवर्गातील आहेत.

Congress Second List

दुसऱ्या यादीतही महाराष्ट्र नाही 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत दोन याद्या (Maharashtra Congress) जाहीर केल्या आहेत. या दोन्हीही याद्यांमध्ये महाराष्ट्राचा विचार केलेला नाही. या याद्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अजून जागावाटप पूर्ण झालेले नाही. चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कदाचित या यादीत महाराष्ट्राचा विचार केला नाही असे सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

Leave a Comment