दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या हायकमांडने काँग्रेसची नवी समिती स्थापन केली आहे. पक्षाच्या हायकमांडने मंडीचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची कमान सोपवली आहे. तर मुकेश अग्निहोत्री विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार आहेत. पक्षाने राज्यासाठी प्रचार, जाहीरनामा, समन्वय आणि राज्य निवडणूक समिती यासारख्या इतर अनेक निवडणूक समित्यांची घोषणा केली आहे. (Himachal Congress New Committee Formed, MP Pratibha Singh Pcc President, Sukhwinder Sukhu Election Campaign Comm)
Coal Power Crisis: तरीही हटेना देशाचा अंधार..! पहा कशा पद्धतीने हतबल झालीय केंद्रीय यंत्रणा https://t.co/8wXje1tLCV
— Krushirang (@krushirang) April 26, 2022
- पहा कोणाला कोणती जबाबदारी आहे ते :
- प्रतिभा सिंह – पीसीसी प्रमुख
- सुखविंदर सिंग सुखू – अध्यक्ष (निवडणूक प्रचार समिती, सदस्य स्क्रीनिंग समिती)
- मुकेश अग्निहोत्री – सीएलपी
- हर्ष महाजन – कार्याध्यक्ष
- राजिंदर राणा – कार्याध्यक्ष
- विनय कुमार – कार्यकारी अध्यक्ष
- पवन काजल – कार्याध्यक्ष
- हर्षवर्धन चौहान- उप सीएलपी
- जगतसिंग नेगी – चीफ व्हीप
- गंगुराम मुसाफिर – वरिष्ठ उपाध्यक्ष
- इंद्रदत्त लखनपाल – वरिष्ठ उपाध्यक्ष
- सुंदरसिंग ठाकूर – वरिष्ठ उपाध्यक्ष
- रवी ठाकूर – वरिष्ठ उपाध्यक्ष
- सुरेश कुमार – वरिष्ठ उपाध्यक्ष
- राजेश शर्मा – खजिनदार
Coal Power Crisis: योगीराज्यालाही लागलाय शॉक..! पहा काय स्थिती आहे उत्तर भारतीय राज्यांमध्ये https://t.co/pYZHjVpmTF
— Krushirang (@krushirang) April 26, 2022
उपाध्यक्ष : संजय अवस्थी, नरेश चौहान, महेश्वर चौहान, हरीश जनार्थ, सुरेंद्र चौहान आणि मोहिंद्र चौहान यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी विप्लव ठाकूर आणि उपाध्यक्षपदी कुलदीप कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार व प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री सुधीर शर्मा आणि उपाध्यक्षपदी सोहनलाल ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश धर्मानी यांना संशोधन समितीचे अध्यक्ष आणि सुनील शर्मा बिट्टू यांना निमंत्रक बनवण्यात आले आहे. मदन चौधरी यांची उपकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार आनंद शर्मा यांना सुकाणू समितीचे अध्यक्ष, तर आशा कुमारी यांना निमंत्रक बनवण्यात आले आहे. धनी राम शांडिल, कुलदीप सिंह राठौर, बिप्लब ठाकूर, कौल सिंह ठाकूर, राम लाल ठाकूर, चंद्र कुमार, सुरेश चंदेल, हर्षवर्धन चौहान यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.
Coal Power Crisis: मोदी सरकार झालेय हतबल; पहा किती राज्यात आलेय वीजसंकट https://t.co/pVVZI770Ow
— Krushirang (@krushirang) April 26, 2022