Congress President: New Delhi: कर्नाटकचे रहिवासी असलेले मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे गांधी घराण्याचे विश्वासू. २४ वर्षात गांधी घराण्याबाहेरचे झालेले ते पहिले काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शशी थरूर म्हणाले, ‘काँग्रेसचे अध्यक्ष (Congress President) होणे ही अत्यंत सन्मानाची, मोठ्या जबाबदारीची बाब आहे, या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मी मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करतो.’
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला असून, खरगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर शशी थरूर (Shashi Tharoor) यांना १०७२ मतेच मिळवता आली. त्यामुळे खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा १७ ऑक्टोबर दिवशी या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
It is a great honour & a huge responsibility to be President of @INCIndia &I wish @Kharge ji all success in that task. It was a privilege to have received the support of over a thousand colleagues,& to carry the hopes& aspirations of so many well-wishers of Congress across India. pic.twitter.com/NistXfQGN1
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 19, 2022
सध्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. २००१ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या. ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदावर पोहोचणारे दुसरे दलित नेते आहेत. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यादरम्यान कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमारही खरगे यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसले.
सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासाचा आलेख हळूहळू चढ-उताराचा दाखवतो. त्यांचा राजकीय प्रवास गुलबर्गा (कलबुर्गी) या त्यांच्या गृहजिल्ह्यातून केंद्रीय नेते म्हणून सुरू झाला. १९६९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि गुलबर्गा शहरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्यासाठी खरगे यांना अनेकदा आघाडीचे दावेदार म्हणून पाहिले जात होते, परंतु ते कधीही या पदापर्यंत पोहोचले नाहीत. जेव्हा जेव्हा दलित मुख्यमंत्र्यांनी त्यांना कर्नाटकात दावेदार म्हणून प्रोजेक्ट केल्याची चर्चा होते, तेव्हा ते अनेकदा म्हणाले, “तुम्ही पुन्हा पुन्हा दलित का म्हणत आहात? असे म्हणू नका. मी काँग्रेसवासी आहे.”
खरगे यांच्या विजयानंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
- हेही वाचा:
- Rain Alert : बाब्बो.. तब्बल ‘इतक्या’ राज्यात मुसळधार बरसणार; जाणून ‘का’ होतोय इतका पाऊस ?
- sky crisis: “या ” जिल्ह्यात पावसाचे थैमान; पिकांचे नुकसान तर बाजार समितीतील मका देखील भिजला
- Pune Heavy Rain : आयुक्तांनी फोडले पावसावर खापर
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट