Congress MLA । काँग्रेसचा मोठा निर्णय! ‘त्या’ 7 फुटीर आमदारांची ठरली शिक्षा

Congress MLA । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली होती. फुटीर आमदारांवर काँग्रेसने कठोर निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीकडून आता पक्षाकडून फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेतला जाऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या आमदारांवर कठोरात कठोर कारवाईची तयारी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून क्रॉस वोटिंग झाल्यानंतर फुटीर आमदारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या आमदारांची नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले होते. काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मत दिले असल्याचे बोलले जातं आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या मैदानात उतरल्या होत्या. पक्षाकडे गरजेपेक्षा जास्त मते होती. त्यामुळे उरलेली मते ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना देणे अपेक्षित होते. पण, काँग्रेस या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले आणि जयंत पाटीलयांना पराभव सहन करावा लागला. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. अशातच आता थोड्या दिवसांवर असणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment