Congress MLA । विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा निर्णय! ‘या’ आमदारांवर करणार कारवाई

Congress MLA । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली होती. फुटीर आमदारांवर काँग्रेसने कठोर निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीकडून आता पक्षाकडून फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकरणावर १९ तारखेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी दिली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा केलीये.

गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावं जनतेसमोर आणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अभिजीत वंजारी यांनीदेखील केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक प्रतिनिधी म्हणून अभिजीत वंजारींची नियुक्ती केली होती. काँग्रेसचे 7 आमदार कसे फुटले यासंदर्भात त्यांनी मोठं विधान केलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयाचा कोटा 23 मतांचा होता. पण काँग्रेसकडे एकूण मतं 37 होती. प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेसकडून 30 मतांचा कोटा ठरवला होता. प्रज्ञा सातवांना 25 मतं पडली. म्हणजेच काँग्रेसची 5 मतं फुटली. काँग्रेसची 37 पैकी उर्वरित 7 मतं मिलिंद नार्वेकरांना दिली जाणार होती. पण नार्वेकरांना ठाकरे गट, माकप आणि एक अपक्ष मिळून 17 आणि काँग्रेसची 5 मतं मिळून एकूण 22 मतं पडली. म्हणजेत काँग्रेसच्या 7 मतांपैकी नार्वेकरांना केवळ 5 मतं पडली आणि 2 मतं फुटली आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्येच सर्वच क्रॉस व्होटिंग करणारे असलयाने त्यामुळे आता कोणाकोणावर कारवाई करणार? असं म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

Leave a Comment