नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. तत्कालीन युपीए सरकारमध्ये मंत्री असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आरपीएन सिंग आज म्हणजेच मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यांच्या या निर्णयाने केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर सपाच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांचा पूर्वांचलमध्ये विशेष प्रभाव असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे, त्यांनी अशा वेळी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे ज्यावेळी पक्षाने त्यांचा उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला होता. अशीही बातमी आहे की, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह पडरौना मतदारसंघातून निवडणूक उतरू शकतात. अशा परिस्थितीत स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण स्वामीही या जागेवरून निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत.
त्यामुळे भाजप आरपीए सिंग यांना उमेदवारी या मतदारसंघातून तिकीट देऊ शकते. 1996, 2002 आणि 2007 च्या विधानसभा निवडणुकीत या पडरौना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आरपीएन सिंह तीन वेळा आमदार राहिले आहेत. यानंतर, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते खासदार झाले आणि युपीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना सतत पराभव पत्करावा लागला.
आरपीएन सिंह हे काँग्रेसच्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत. ते काँग्रेसच्या राष्ट्रीय संघाचाही एक भाग राहिले आहेत. पक्षाने त्यांना झारखंडचे राज्य प्रभारीही केले. त्यानंतर मात्र आरपीएनचा काँग्रेसबद्दलचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता काँग्रेसच्या अडचणी आधिकच वाढणार आहेत. आधीच या राज्यात काँग्रेस अडचणीत आहे. त्यानंतर या धक्क्याने पक्षाच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.
बाब्बो.. तर ‘त्या’ 80 आमदारांना तिकीट नाही..? ; भाजप लवकरच करणार मोठी घोषणा..