दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 तारखेला येतील. प्रदेश काँग्रेसला सरकार स्थापनेचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस पक्षाने माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सिमला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी राहुल गांधी यांना ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान शिमला भेटीचे निमंत्रण दिले आहे.
राजकीय जाणकार याला काँग्रेसचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले काँग्रेसचे नेते एक एक करून दिल्ली दरबारात हजेरी लावत आहेत आणि सगळे आपापले दावे बळकट करण्यात व्यस्त आहेत. विक्रमादित्य सिंह म्हणाले की, गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारचा ट्रेंड इतर राज्यांमध्ये दिसत आहे, तो पाहता भाजप येथेही घोडेबाजार करू शकतो. हिमाचलमध्ये घोडेबाजाराचा कोणताही मुद्दा नसल्याचा दावा त्यांनी केला कारण राज्यात काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.
विक्रमादित्य सिंह म्हणाले की, येथील काँग्रेस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला विनंती केली आहे की आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मतमोजणीपूर्वी हिमाचलमध्ये यावे जेणेकरून भाजपला संधी मिळू नये. त्यासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते येत्या काही दिवसांत हिमाचलला पोहोचणार आहेत. काँग्रेस पक्षही बंडखोरांशी चर्चा करत असल्याचे विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले. त्यांना सरकारसोबत येण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात अनेक जागांवर तिरंगी लढत होत आहे. अनेक जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतात.
सिंह यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना संयम राखण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, की आता लोकांना देखील समजले आहे की सरकार बदलणार आहे. पण जयराम ठाकूर यांना मात्र हे समजेनासे झाले आहे. असे वाटत आहे सरकारी गुप्तचर यंत्रणा त्यांना वेगळीच काहीतरी माहिती देत आहे.
- हे सुद्धा वाचा : Himachal Pradesh Polls : पंजाबचा ‘तो’ प्लान हिमाचल प्रदेशात; पहा, काय आहे केजरीवालांचे राजकारण ?
- Himachal Election : अर्र.. काँग्रेलाही वाटतेय ‘त्याची’ भीती; पक्ष घेणार मोठा निर्णय; जाणून घ्या..