Congress : सर्व पक्षांना लोकसभेच्या निकालाची आतुरता लागली आहे. अशातच तेलंगणात विधानसभेनंतर काँग्रेसने लोकसभेत विजयाचा दावा केला आहे. सीएम रेवंत रेड्डी यांनी पक्ष किती जागा जिंकेल? हे स्पष्ट केले आहे.
नुकतेच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रत्येक राज्यातील जागांच्या संदर्भात मोठे विधान केले होते. बोलताना ते म्हणाले की, ‘उत्तरेमध्ये, आम्ही मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आमच्या जागा कायम ठेवू. तसेच आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या जागा वाढवू.
हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात देखील जागा कायम ठेवू. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला 30 पेक्षा जास्त जागा मिळू शकतील, आमच्याकडे 18 जागा होत्या आणि त्यामुळे आम्ही आमच्या जागा जवळपास दुप्पट करू. ओडिशामध्ये एकूण 21 जागा आहेत आणि आम्ही 18 ओलांडू शकू. तेलंगणामध्ये आम्ही ४-५ असा विजय मिळवणार आहोत.
राहुल गांधी होणार देशाचे पंतप्रधान
या विधानानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विधान समोर आले आहे. बोलताना ते म्हणाले की, भाजप चार-पाच जागा जिंकण्याचा दावा करत असून बीआरएसला एकापेक्षा जास्त जागा मिळू शकत नाहीत आणि एआयएमआयएम हैदराबाद लोकसभा मतदारसंघ राखेल. कमीत कमी 10 तरी जागा काँग्रेसला मिळतील. रेवंत रेड्डी पुढे म्हणाले की, तामिळनाडू आणि केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये इंडिया ब्लॉक मोठा विजय मिळवेल.
राहुल गांधी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “भाजपला 240 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने मागील 10 वर्षात राज्यासाठी काही महत्त्वाचे काम केले नाही, असा आरोप करून मुख्यमंत्री म्हणाले की, भारतातील आघाडी सरकार स्थापन झाले तर केंद्रीय मंत्रिमंडळाने तेलंगणाला महत्त्वाच्या खात्यांचे वाटप केले पाहिजे .
भाजप चार-पाच जागा जिंकण्याचा दावा करताना, बीआरएसला एकापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. एआयएमआयएम हैदराबाद लोकसभा मतदारसंघ राखेल. रेवंत रेड्डी म्हणाले की उर्वरित जागा, कमीत कमी 10 जागा काँग्रेसकडे जातील.