Congress Candidates List : कंगना अन् मनोज तिवारी; भाजपाच्या फिल्मी स्टार्सविरुद्ध काँग्रेसचे नवे चेहरे

Congress Candidates List for Lok Sabha Election : काँग्रेसने मागील दोन दिवसांत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर (Congress Candidates List) केल्या. शनिवारी 16 उमेदवारांची तर रविवारी 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी आणि ईशान्य दिल्ली या मतदारसंघांचा समावेश आहे. मंडी मतदारसंघात भाजपने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीला उमेदवारी दिली आहे. कंगनाच्या विरोधात कोण असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर काँग्रेसने या मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार दिला आहे. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि हिमाचल काँग्रेस प्रभारी प्रतिभा सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना तिकीट दिले आहे.

विक्रमादित्य सिंह यांना तिकीट दिल्याने आता येथील लढत अटीतटीची होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका मांडत होती. महाराष्ट्रात तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि कंगना वाद चांगलाच चर्चेत राहिला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनाने मविआ सरकारवर घणाघाती टीका केली होती. यानंतर कंगना लवकरच राजकारणात एन्ट्री घेईल अशी चर्चा होती.

Raver Lok Sabha | नाराजी उफाळली! शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रावेरात नेमकं काय घडलं?

Congress Candidates List

अखेर भाजपाने तिला लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट देत मैदानात उतरवले आहे. कंगनाच्याविरोधात विक्रमादित्य उमेदवारी करत आहेत. मध्यंतरी ते काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आता यातून मार्ग काढत काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. कंगनाने मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. तिच्या प्रचारसभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

मनोज तिवारीला टक्कर देणार काँग्रेसचा कन्हैय्या 

दिल्लीत एकूण सात लोकसभेच्या जागा आहेत. मनोज तिवारी वगळता (Manoj Tiwari) भाजपना सर्व मतदारसंघात नवीन चेहरे दिले आहेत. मनोज तिवारी पुन्हा ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढत आहेत. काल रविवारी काँग्रेसने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केली. यात ईशान्य दिल्लीतून कन्हैय्या कुमारला तिकीट देण्यात आले आहे. कन्हैय्या कुमार त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. मनोज तिवारी यांच्याविरोधात दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचे नाव चर्चेत होते. मात्र राहुल गांधी यांनी कन्हैय्या कुमारच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ईशान्य दिल्ली मतदारसंघातून कन्हैय्या कुमारचे नाव फायनल झाले.

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

Leave a Comment