Congress Candidate List Ajay Rai : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या (Congress Candidate List) यादीत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय (Ajay Rai) यांचे नाव आहे. अजय राय हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) विरोधात काँग्रेसने अजय राय यांना वाराणसी लोकसभा (Varanasi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अजय राय यांनी याआधी दोन वेळेस पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवली आहे. परंतु या दोन्ही वेळेस मोदींनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. असे असतानाही काँग्रेसने त्यांना पुन्हा मोदींविरोधातच तिकीट दिले आहे. तर जाणून घेऊ या पीएम मोदींना दोनदा टक्कर देणारे अजय राय नेमके कोण आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात अजय राय काँग्रेसचे उमेदवार होते. आताही काँग्रेसने (COngress Party) त्यांनाच उमेदवारी दिली आहे. 2019 मधील निवडणुकीत अजय राय तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवार शालिनी यादव यांना 4 लाख 80 हजार मतांच्या फरकाने पंतप्रधान मोदी यांनी मात दिली होती.
या निवडणुकीत अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या निवडणुकीत मोदींना 63.62% तर अजय राय यांना 14.38% मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अजय राय मोदींविरोधात निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत अजय दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दिल्लीचे आताचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही (Arvind Kejriwal) या निवडणुकीत होते.
Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?
तसं पाहिलं तर अजय राय यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पार्टीतूनच सुरू झाली होती. अजय राय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP) राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी अजय राय यांचे भाजपबरोबर जुने नाते होते. उत्तर प्रदेशात भाजपचा (Uttar Pradesh) विस्तार करण्यात त्यांचेही योगदान राहिले आहे. याआधी अजय राय वाराणसी मतदारसंघातून पाच वेळेस आमदार राहिले आहे. त्यातील तीन टर्म ते भाजपचेच आमदार होते. ५४ वर्षीय अजय राय भूमिहार या समाजातून येतात. भूमिहार समाजाचा वाराणसीच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे.
अजय राय यांनी 1996 मध्ये राजकारणात एंट्री घेतली होती. कोलासला या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत त्यांनी आमदारकी मिळवली. यानंतर 2002 मध्ये याच मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले होते. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या नेतृत्वातील भाजप-बसपा सरकारमध्ये अजय राय सहकारिता राज्यमंत्री होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. परंतु भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी दिली.
Lok Sabha Elections 2024 : ओडिशात भाजपला धक्का! ‘या’ पक्षाबरोबर आघाडी होणार नाही; पहा, काय घडलं?
भाजपाच्या या निर्णयामुळे अजय राय कमालीचे नाराज झाले. यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) उमेदवारी मिळवली. परंतु निवडणुकीत त्यांचा करिश्मा चालला नाही या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसबरोबर राजकारणाला सुरुवात केली. काँग्रेसच्या तिकिटावर पिंडरा या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असलेले नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तिकीट दिले. परंतु, त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांना राजगड मतदारसंघातून तिकीट दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघात आमदार विकास ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत.