Congress Candidate First List : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Congress Candidate First List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काँग्रेस पक्षाने शुक्रवारी (Congress Candidate First List) पहिली यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधींपासून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी तिकीट मिळाले आहे. राहुल गांधी पुन्हा (Rahul Gandhi) एकदा वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील तर भूपेश बघेल यांना राजनांदगाव मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. महासमुंद मतदारसंघात काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य ताम्रध्वज साहू यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत.

काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.  या यादीत कुणाला उमेदवारी देण्यात आली आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही अनेक आश्वासने दिली आहेत. काँग्रेस सरकार आल्यास आम्ही ही सर्व आश्वासने पूर्ण करू. याआधी आम्ही कर्नाटक आणि तेलंगाणातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. तसेच आता तीस लाख रोजगार देण्याचेही आश्वासन आम्ही पूर्ण करू.

Congress Bank Accounts Frozen । काँग्रेसला मोठा झटका! प्राप्तिकर विभागाने गोठवले काँग्रेस पक्षाचे बँक खाते

Congress Candidate First List

काँग्रसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले, आम्ही सर्वत्र इंडिया आघाडीबरोबर (INDIA Alliance) वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, अजूनही पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यात काही अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काँग्रेस पक्षाचे धोरण स्पष्ट आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी करण्यासाठी लढणार आहोत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत छत्तीसगड सहा, कर्नाटक सात, केरळ 16, लक्षद्वीप एक, मेघालय दोन, नागालँड एक, सिक्कीम एक, तेलंगाणा चार आणि त्रिपुरा राज्यातून एका अशा एकूण 39 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी, तिरुवनंतपूरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल या दिग्गज नेत्यांना तिकीट मिळाले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 15 उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहेत तर 24 उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक प्रवर्गातील आहेत.

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

Congress Candidate First List

महाराष्ट्राचा विचार नाही

मागील आठवड्यात भाजपने 17 राज्यांतील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यानंतर काँग्रेसने आज जाहीर केलेल्या यादीतही महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अजून जागावाटप पूर्ण झालेले नाही. चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कदाचित या यादीत महाराष्ट्राचा विचार केला नाही असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment