Competition commission penalty: मुंबई (Mumbai): देशातील स्पर्धा आयोगाने (The Competition Commission) मेक माय ट्रिप, गोईबीबो आणि ओयो या तीन ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग सेवा पुरवठादारांना तब्बल 392 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सर्वांवर इतरांना त्रासदायक असा अन्यायकारक व्यवसाय केल्याचा आरोप आहे. आयोगाने MakeMyTrip आणि Goibibo वर 223.48 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर OYO वर 168.88 कोटी रुपयांचा दंड (penalty) ठोठावला आहे.
MakeMyTrip आणि Goibibo यांनी त्यांच्या हॉटेल भागीदारांसोबत करार केला आहे. ज्याअंतर्गत हॉटेल भागीदार (hotel partners) त्यांच्या खोल्या इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर किंवा त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर (online portal) या कंपन्यांना निश्चित किमतीच्या समान किंवा कमी किमतीत भाड्याने देऊ शकत नाहीत. त्यामुळे स्पर्धेच्या युगात ही मोठी व्यावसायिक आडकाठी आहे. स्पर्धा आयोगाने MakeMyTrip आणि Goibibo ला हॉटेल भागीदारांसोबत केलेल्या करारांमध्ये दंडासह योग्य बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. कमिशनने खोलीच्या किमतीच्या करारातील अटी काढून टाकण्याचे आदेशही दिले. जेणेकरुन हॉटेलवाले खोल्यांची उपलब्धता सुनिश्चित करू शकतील आणि ते इतर ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीसोबत काम करू शकतील.
- Diwali Festival Car Discount: कार घेण्यापूर्वी चेक करा की डिस्काऊंट; मगच करा निवड
- Sudden Cardiac Arrest: सडन कार्डियाक अरेस्ट रोखण्यासाठी हे 5 सोपे उपाय ठरू शकतात प्रभावी
- Best Car : दिवाळीत कार खरेदी करताय.. मग, ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या दमदार कार; चेक करा डिटेल..
त्याच बरोबर, आयोगाने MakeMyTrip आणि Goibibo ला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हॉटेल्सना वाजवी, पारदर्शक आणि भेदभावरहित प्रवेश प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. प्लॅटफॉर्मची सूची, अटी आणि शर्ती योग्य पद्धतीने तयार केल्या जातील. MakeMyTrip ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर OYO ला प्राधान्य दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे इतर हॉटेल भागीदारांचे नुकसान झाले आहे. आयोगाने ऑक्टोबर 2019 च्या या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. MakeMyTrip ने 2017 मध्ये Ibibo ग्रुप होल्डिंग विकत घेतले. तेव्हापासून, MMT इंडिया आपला हॉटेल आणि पॅकेज व्यवसाय Goibibo द्वारे MakeMyTrip आणि Ibibo India या ब्रँड अंतर्गत चालवत आहे.