Compact suv cars : 7 लाखांपेक्षा स्वस्तात घरी न्या टाटाची ‘ही’ फॅमिली कार, कुठे मिळतेय ऑफर; जाणून घ्या

Compact suv cars : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता तुमच्या बजेटमध्ये Tata ची फॅमिली कार खरेदी करता येईल. विशेष म्हणजे या कारला बाजारात चांगली मागणी आहे. कंपनीकडून या शानदार कारला 18.8 kmpl पर्यंत मायलेज देण्यात आले आहे. तुमच्यासाठी ही कार उत्तम पर्याय असू शकते.

टाटा पंचचा ग्राउंड क्लीयरन्स

ग्लोबल NCAP सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये कारला 5 स्टार मिळाले असून कंपनीकडून या बॉक्सी लूक कारमध्ये 1199 सीसी इंजिन देण्यात आले आहे. टाटा पंचचा ग्राउंड क्लीयरन्स 187 मिमी इतका आहे, त्यामुळे खराब रस्त्यांवर कार चालवत असताना वाहनचालकांना कोणतीही अडचण येत नाही. खरं तर ग्राउंड क्लीयरन्स म्हणजे कारचे प्लॅटफॉर्म आणि जमिनीतील अंतर.

टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम

या शानदार कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सहा एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आले आहे, ही ब्रेकिंग सिस्टम अपघात टाळण्यास मदत करते. कंपनीच्या या कारमध्ये चार प्रकार देण्यात आले आहेत. तर या कारमधील मागील सीटवर एसी व्हेंट्स आणि पॉवर विंडो उपलब्ध आहेत.

मायलेज

कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येत असून ही कार पेट्रोलवर 18.8 kmpl पर्यंत मायलेज देते. या कारला 16 इंचाचा मोठा टायर दिला आहे, कंपनी कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स देखील देत आहे.

टाटा पंचची फीचर्स

  • 5 स्पीड गिअरबॉक्स
  • मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशन
  • 5 सीटर कारमध्ये ड्युअल कलर पर्याय
  • 88 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क
  • दोन ड्रायव्हिंग मोड सिटी आणि इको
  • एलईडी हेडलाइट आणि टेललाइट

Leave a Comment