Common Mistakes : अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अनेकजण जेवणानंतर काही चुका करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो.
जेवणानंतरच्या टाळा ‘या’ चुका
पाणी
तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता जेणेकरून तुमची अन्ननलिका स्वच्छ होण्यास मदत होईल. हे लक्षात ठेवा की जेवल्यानंतर पोटभर पाणी प्यायले तर तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचते. असे केले तर पचनसंस्थेला आरोग्यासाठी हानिकारक अन्न पचण्यात अडचणी येतात.
जेवणानंतरची झोप
अनेकदा जेवण केल्यानंतर माणसाला खूप झोप येत असते. यामुळे तो जेवण केल्यानंतर लगेच झोपतो किंवा हलकी डुलकी घेतो. पण तसे करणे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. जेवल्यानंतर लगेच झोपले तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे तुम्हाला पोट फुगणे, अपचन, ॲसिडिटी आणि हार्ट बर्न सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
धूम्रपान
कोणत्याही वेळी धूम्रपान करणे आरोग्यासाठी खूप घातक आहे. जेवणानंतर धुम्रपान करणे आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते. असे म्हटले जाते की जेवणानंतर धूम्रपान करणे 10 सिगारेट ओढण्यासारखे आहे.
गोड पदार्थ
भारतात, जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड बहुतेक घरांत पाळण्यात येतो. तुमची ही सवय तुमच्या रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढवू शकते. अशा वेळी जेवणानंतर मिठाईची गरज भागवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट किंवा नैसर्गिक स्वीटनरचा तुकडा निवडा.
चहा कॉफी
अनेकांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण चहा आणि कॉफीमध्ये असलेले टॅनिन अन्नातून पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकतात. अशा वेळी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हर्बल चहाचे सेवन करू शकता.