दिल्ली – सततच्या वाढत्या किमतींनंतर आता अचानक सरकारने जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर(LPG gas cylinder), पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलसाठी 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपये अनुदान कपात करण्यात आली आहे.
अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) महागाईबद्दल लोकांच्या सरकारकडे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र आता सरकारने या प्रकरणी मोठे पाऊल उचलत हा निर्णय घेतला आहे.
उत्पादन शुल्कात कपात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जयपूरमध्ये सांगितले होते की, त्यांना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करावा लागेल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरनंतर दुसऱ्यांदा उत्पादन शुल्कात कपात करून वाढत्या महागाईला लगाम घालण्याचे काम त्यांनी केले आहे. साहजिकच या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
शासन 200 रूपये अनुदान देत आहे
गॅस सिलिंडरच्या दराबाबत बोलायचे झाले तर सर्वसामान्यांना यात मोठा दिलासा मिळाला आहे. 200 रुपये प्रति सिलेंडर कपात करण्यात आली आहे. सरकारने हे 200 रुपये अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच घेता येणार आहे. तसेच, वर्षभरात केवळ 12 सिलिंडरसाठी 200 रुपयांची सबसिडी मिळणार आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
काय म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. ते पुढे म्हणाले, ‘या वर्षी आम्ही 9 कोटींहून अधिक लोकांना (प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी) प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देणार आहोत.