Cold Milk : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. अनेकजण उन्हापासून वाचण्यासाठी विविध उपाय करत आहेत. जर तुम्ही या दिवसात थंड दूध प्यायला तर तुम्हाला अनेक जबरदस्त फायदे होतील.
मिळेल शांत झोप
शांत झोप येण्यासाठी थंड दुधाचेही सेवन करा. विशेष म्हणजे हे प्यायल्याने बीपीमध्ये चढउतार होण्याची समस्या होत नाही आणि शरीर आरामशीर होते. दिवसभराच्या व्यस्त जीवनानंतर तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी थंड दूध फायदेशीर आहे.
छाती आणि पोटाची जळजळ थांबते
उन्हाळ्यात अनेकदा लोकांना छातीत आणि पोटात जळजळ होते. अशावेळी कॅल्शियम समृद्ध दूध अतिरिक्त ऍसिड शोषून ऍसिड तयार होण्यापासून रोखण्यासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे आजकाल जर तुम्हीही पचनसंस्थेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्यास थंड दुधाचे सेवन करा. असे केल्याने ॲसिड रिफ्लक्समुळे होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो.
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी थंड दूध फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सही कमी होतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी ज्यांचे बीपी अनेकदा उच्च राहते त्यांनीही थंड दूध प्यावे.
वजन
वजन कमी करण्यासाठी गरम दुधापेक्षा थंड दूध पिणे खूप फायदेशीर आहे. समजा तुम्ही व्यायाम आणि आहारासोबतच थंड दुधाला तुमच्या दिनक्रमाचा भाग बनवले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. ते प्यायल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे केवळ अतिरिक्त कॅलरीज बर्न होत नाहीत, तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. भूक लागत नाही. तुम्हाला हळूहळू तुम्हाला वजन कमी करण्याचे फायदे दिसू लागतात.