Coconut water । नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण हे नारळ पाणी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. शिवाय नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट संतुलन पूर्ण करण्यास नारळ पाणी खूप मदत करते. इतकेच नाही तर नारळपाणी प्यायले तर उष्णता आणि आर्द्रतेपासून आराम मिळतो. पण उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी नारळ पाणी प्यावे की नाही? हा अनेकांना प्रश्न पडतो.
उच्च रक्तदाब असेल तर नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या
- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नारळाचे पाणी प्यायल्याने फायदा होत असला, तरी ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. तसेच त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच नारळाचे पाणी प्या. नाहीतर तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो.
- नारळ पाणी प्यायले तर आपल्या शरीरात जमा झालेले अतिरिक्त लोह आणि सोडियम लघवीच्या मदतीने बाहेर पडतात. असे झाले तर रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- नारळाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. यामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरता सहज भरून काढता येते.
- किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांनी नारळ पाणी सेवन टाळावे, हे लक्षात ठेवा. कारण त्यात आढळणारे पोटॅशियम किडनी फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे त्याचे चुकूनही सेवन करू नये.
- ज्यांचा रक्तदाब खूप कमी असून त्यांनी नारळ पाणी पिऊ नये. बीपीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याच वेळी, जर तुमची शस्त्रक्रिया होणार असेल किंवा झाली असल्यास तर हे पाणी अजिबात पिऊ नका.
- अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील तुम्ही नारळ पाणी सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.