मुंबई- स्पॉट फिक्सिंग प्रकरणात (case of spot fixing) अडकलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने (S Sreesanth) आयपीएल 2022 च्या (IPL 2022) लिलावासाठी (Mega auction) स्वतःची नोंदणी केली आहे. एका प्रसिद्ध क्रिकेट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, श्रीसंतने त्याची बेस प्राईस 50 लाख (50 lakhs) रुपये ठेवली आहे. (Cochin Express ready for return in IPL, so put BASE PRICE)
श्रीशांत शेवटचा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळला होता आणि या संघासोबत खेळताना तो 2013 मध्ये फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्याच्यासह त्याच संघाचे आणखी दोन खेळाडू फिक्सिंग प्रकरणात अडकले आहेत. आयपीएलसाठी एकूण 1 हजार 214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावापूर्वी ही यादी कापली जाणार आहे.
फिक्सिंगच्या आरोपांमुळे श्रीशांतने अनेक वर्षे लढा दिला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते. अखेर, बीसीसीआयने (BCCI) श्रीशांतला क्लीन चिट दिली आणि आता कोणत्याही संघाने त्याला निवडले तर तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. गतवर्षीही त्याने लिलावासाठी आपले नाव दिले होते मात्र त्याला कोणत्याही संघाने खरेदी केला नव्हता. आपल्यावरची बंदी उठल्यानंतर तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये (सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे) खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 44 सामन्यांत 40 विकेट घेतल्या आहेत.(Cochin Express ready for return in IPL, so put BASE PRICE)