CNG WaganR Offer: आपण सेकंड हँड म्हणजे जुनी पण व्यवस्थित वापरलेली कार (second hand maruti Suzuki cars offer) घेऊ इच्छित असाल तर ही आपल्यासाठी संधी आहे. कारण फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर मस्त ऑफर असलेल्या युझड कार (used cars) उपलब्ध आहेत. आपण अनेकदा कार घ्यायची म्हटले की जुन्या कार विक्रेत्याना फोन करतो. ते प्रत्येक कारमध्ये खरेदी-विक्री मार्जिन / कमिशन म्हणून लाखो रुपये कमावत असतात. त्यामुळे फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर बऱ्याचदा थेट विक्रेता आणि आपण यांच्यात संवाद करून जुनी कार लाखो रुपये कमी किमतीत मिळू शकते.
अनेकदा आपण जुनी कार एखाद्या सेकंड हँड कार सेलर (second hand car dealer margin) यांच्याकडून घेतली आणि अगदी सहा महिन्यात त्यांच्याकडे नेली तर यातल्या अफाट मार्जिन मनीचा नेमका खेळ अनेकांच्या लक्षात आलेला असेल. कारण आपण समजा त्यांच्याकडून एखादी कार ३ लाख रुपयांना खरेदी केली आणि आपल्याला सहा महिन्यांनी नवीन घेण्याची हुक्की आली तर ती त्याच कारला दीड ते दोन लाखात मागतात. आपण कार आणल्यावर मस्त तिची निगा रखलेली असते. काही पार्ट गरजेनुसार नवीन टाकलेले असतात. तरीही ही मंडळी रेट पाडून मागतात. तसेच आपल्याकडून भाव पाडून कमी किमतीत घेतलेली हीच कार फक्त पॉलिश करून पुन्हा लाखभर कमिशन काढून दुसऱ्या ग्राहकांना देतात. त्यामुळे अशा फेऱ्यात अडकण्यापेक्षा थेट फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर कार घेतल्यास विक्रेत्यास थोडी जास्त रक्कम मिळते. मात्र, खरेदीदार मंडळींना यातून लाखोंचा फायदा होत असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. https://www.facebook.com/marketplace/item/305581581975327/?mibextid=dXMIcH
आताही फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर (facebook.com marketplace) अनेक खास ऑफर असेलल्या दिसतात. मुख्य म्हणजे सध्या बाजारात अफाट मागणी असलेली आणि वापरायला सुलभ असलेली Maruti Suzuki Wagan R CNG कार तर थेट खरेदी-विक्री यात आघाडीवर आहे. मागणी आणि पुरवठा या सुलभ सूत्रामुळे अनेकजण फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर यावर कार घेण्यास पसंती देत आहेत. अनेकजण यावरून कार घेताना काय गॅरंटी असाही मुद्दा उपस्थित करतात. मात्र, आपण सेकंड हँड कार डीलर यांच्याकडून कार घेतली तरी एकदा त्यांच्याकडून चावी ताब्यात घेऊन आपण गेटच्या बाहेर पडलो की तेही काहीच गॅरंटी देत नाहीत. अर्थात ज्यांना गॅरंटी हवी आहे अशा मंडळींनी कार्स २४, स्पिनी अशा स्टोअरला भेट दिली किंवा त्यांच्याकडून ऑनलाइन खरेदी केली तर मग अशी काही गोष्टींची गॅरंटी मिळते. मात्र, त्यालाही खूप मर्यादा आहेत. त्यामुळेच साध्य फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर अनेक खास ऑफर असेलल्या कार थेट खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती दिसते.
सध्या Marketplace – Wagan R CNG 2017 model | Facebook या लिंकवर क्लिक करून अनेक मस्त ऑफर्स असेलल्या कार आपण सहजपणे खरेदी करू शकता. मात्र, तरीही कार घेताना संबंधित व्यक्तीचे प्रोफाइल चेक करून घेऊन मगच थेट कार पाहायला जावे. दुर्गम भागातील कार घेण्याचे टाळावे. त्यात फसवणूक करणारे असल्याची शक्यता जास्त आहे. तसेच कमी किमतीत दिसते म्हणून कोणतीही कार खरेदी करू नये. कारण मग ती खराब असेल म्हणुनच विक्रीला ठेवलेली असू शकते. मुख्य म्हणजे अनेक सेकंड हँड कार डीलर हेही माझीच कार असल्याची बतावणी करून फेसबुक मार्केटप्लेस स्टोअरवर जास्त रेटमध्ये कार विकत असल्याचे दिसते. त्यामुळे आपण संबंधित विक्रेत्याशी व्हॉटसअप आणि थेट फोन कॉल याद्वारे संवाद साधून खात्री करून मगच कार खरेदी करावी.
अनेकदा आपण जुनी कार किंवा वाहन खरेदी करताना यापूर्वी मालक किती होते आणि किती किलोमीटर चालवली आहे यांचे गणित लावतो. मुळात व्यवस्थित कार वापरणे आणि मेंटेनन्स व सर्विसिंग वेळेवर करणे हाच मुद्दा जास्त महत्वाचा आहे. एखादा मालक पहिलाच आहे आणि त्याने कार खूप कमी पळवली आहे म्हणजे बेस्ट कार असेही नाही. कारण त्याला वाहन चांगली चालवता येत नसतील किंवा त्याने मेंटेनन्स व सर्विसिंग वेळेवर केलेले नसेल तर इंजिन गाडी उभी असूनही खराब होते. त्यामुळे सर्व बाजूने विचार करून मग मस्त कार निवडण्याचा खुला पर्याय उपलब्ध असलेल्या फेसबुक मार्केटप्लेस याचा मोठा आधार ग्राहकांना वाटत असल्याचे दिसत आहे.