CNG Price : वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! CNG च्या दरात कमालीची घसरण

CNG Price : आता वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. CNG च्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरात कपात केली आहे.

महानगर गॅस लिमिटेडने CNG ची किंमत 5 मार्चच्या मध्यरात्री पासून 73.50 रुपये प्रति किलो केली आहे. “गॅस इनपुट कॉस्ट कमी केल्यामुळे MGL मुंबई आणि आसपासच्या सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात करण्याची घोषणा कंपनीने केली.

कंपनीने म्हटले आहे की MGL च्या CNG किमतीत आता मुंबईतील सध्याच्या किमतीच्या पातळीवर पेट्रोलच्या तुलनेत 53% आणि डिझेलच्या तुलनेत 22% बचत मिळते. सीएनजीच्या किमतीतील या कपातीमुळे वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढेल.

201 सीएनजी स्टेशनचे उद्घाटन

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी 17 राज्यांमधील 201 सीएनजी स्टेशन आणि मध्य प्रदेशातील विजयपूर येथे पहिल्या लघु-स्तरीय एलएनजी युनिटचे उद्घाटन केले आहे. हे 17 राज्यांमधील 52 भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरले असून GAIL ने विजयपूर एलपीजी प्लांटमध्ये देशातील पहिले लघु-स्तरीय LNG युनिट स्थापन केले आहे.

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, “ही सीएनजी स्टेशन्स पारंपरिक इंधनाला हिरवा पर्याय म्हणून सीएनजीच्या वापरास प्रोत्साहन देतील. यासह, देशातील सीएनजी स्टेशनची संख्या 6,200 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी, घराघरांत पोहोचणाऱ्या पीएनजी कनेक्शनची संख्या 1.21 कोटींवर गेली आहे. हे लक्षात घ्या की गेल समूहातील कंपन्यांचा देशातील सीएनजी स्टेशनमध्ये 40 टक्के आणि पीएनजी कनेक्शनमध्ये 64 टक्के हिस्सा आहे. आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment