CNG-PNG Price Hike : सणासुदीच्या काळात आम आदमीच्या खिशाला आणखी एक झटका बसला आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये (CNG Price Increase In Delhi NCR) आजपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किमती वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने CNG च्या दरात प्रति किलो 3 रुपयांनी वाढ (CNG-PNG Price Hike) केली आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळपासून नवीन दर लागू झाले आहेत. त्याचवेळी पीएनजीच्या (PNG) किमतीतही ५ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादसह अनेक उत्तर भारतीय शहरांमध्ये आजपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. करनाल, कानपूर आणि मुझफ्फरनगरसारख्या शहरांमध्येही किमती वाढल्या आहेत.
दिल्ली मध्ये 75.61 रुपये प्रति किलोवरून 78.61 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 78.17 रुपये प्रति किलोवरून 81.17 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. गुरुग्राममध्ये प्रति किलो ८३.९४ रुपये ते ८९.०७ रुपये प्रति किलो झाले आहेत. रेवाडीमध्ये 86.07 रुपये प्रति किलोवरून 89.07 रुपये प्रति किलो असे दर आहेत. करनाल आणि कैथलमध्ये 84.29 रुपये प्रति किलो ते 87.27 रुपये प्रति किलो. मुझफ्फरनगरमध्ये 82.84 रुपये प्रति किलो ते 85.84 रुपये प्रति किलो आणि कानपूर शहरात 87.40 रुपये प्रति किलो ते 89.81 रुपये प्रति किलोपर्यंत दर वाढले आहेत.
दिल्लीत PNG ची किंमत 53.59 प्रति मानक घनमीटर (SCM) पर्यंत वाढली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किंमत 53.46 वर गेली आहे. त्याच वेळी, मुझफ्फरनगर, शामली आणि मेरठमध्ये किंमत 56.97 प्रति मानक घनमीटरवर पोहोचली आहे. त्याचवेळी, कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये पीएनजीची किंमत 56.10 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
- Read : Petrol : पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर; पहा, तुमच्या शहरात किती रुपयांत मिळेल पेट्रोल
- CNG Price : खूशखबर..! सीएनजीचे दर कमी होणार; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- PNG Price : महागाईच्या दिवसात आम आदमीला आणखी एक झटका; ‘या’ इंधनाच्या दरात मोठी वाढ..