CNG Car Tips : भारतीय बाजारात अनेक कार निर्मात्या कंपन्या आपल्या CNG वर चालणाऱ्या कार लाँच करत आहेत. जर तुमच्याकडे CNG वर चालणारी कार असेल किंवा CNG कार चालवणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर तुमच्या कारला आग लागेल.
अधिकृत सीएनजी किट वापरा
अनेकजण कारचे चांगले मायलेज मिळवण्यासाठी विविध युक्त्या करतात, पण ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही अधिकृत सीएनजी किटच वापरावे.
इंधन टाकी फुल भरू नका
तसेच सीएनजी कारमध्ये इंधन पूर्णपणे भरू नका. इंधन टाक्यांमध्ये दाब वाढतो आणि ते फुटू शकते.
ॲक्सेसरीज
सीएनजी कारमध्ये स्वस्त वस्तू वापरू नका. या गोष्टी भविष्यात तुम्हाला महागात पडेल. स्वस्त ॲक्सेसरीजऐवजी तुम्ही कोणत्या तरी ब्रँडच्या ॲक्सेसरीज वापरा. तुम्ही न जुळणारे सिलिंडर किंवा इंधन किट वापरू नका.
गॅस स्टेशनवर थांबवा कार
तुम्ही तुमच्या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी जाता तेव्हा गॅस स्टेशनवर ते पूर्णपणे बंद करा. गाडीत लोक असतील तर त्यांनाही गाडीतून उतरायला सांगा. कारण इंजिनमध्ये गॅस भरत असताना, एक लहान ठिणगी आगीचे रूप धारण करते.
कारच्या आत धुम्रपान टाळा
कार कोणतीही असो, त्यात बसून कधीही धूम्रपान करू नका. कारण असे करणे धोकादायक ठरू शकते. सीएनजी कारच्या आत एक ट्रंक आहे, जी गॅसने भरलेली आहे. एका लहान ठिणगीमुळे ते आगीमध्ये बदलू शकते.
कार मेन्टेन ठेवा
कार नेहमी मेन्टेन ठेवणे गरजेचे आहे. CNG फिल्टर बदलत राहा, कारण जास्त वापराने फिल्टर अडकू शकतो.