Cibil score : सिबिल स्कोर खराब असला तरीही मिळेल तुम्हाला कर्ज, ‘या’ पद्धतींचा करा वापर

Cibil score : अनेकजण आपल्या गरजा करण्यासाठी कर्ज काढतात. कमी व्याजदर असणाऱ्या बँकांकडून कर्ज घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण तुम्ही कर्ज घेणार असाल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा लागतो. जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळताना अडचण येते. पण तुम्ही आता सिबिल स्कोर खराब असेल तरीही कर्ज मिळवू शकता.

खराब CIBIL स्कोर असेल तर वैयक्तिक कर्ज उपलब्ध होत नाही. पण तुम्ही काही पद्धतीचा वापर करून खराब क्रेडिट स्कोअर असतानाही सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान आहे. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. समजा तुमचा CIBIL स्कोर यापेक्षा कमी असल्यास तुम्हाला कर्ज घेण्यात अडचण येते. ते कमी असेल तर कर्ज मिळत नाही.

या पद्धतीचा करा वापर

तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर सह-स्वाक्षरीदार किंवा गॅरेंटरच्या मदतीने कर्ज मिळवणे हा पहिला मार्ग आहे. तुम्ही सह-स्वाक्षरीकर्त्याच्या मदतीने अर्ज केला तर बँक तुमच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करेल. त्याचप्रमाणे, गॅरेंटर असेल तर आपण कर्जाच्या पेमेंटमध्ये कोणतीही अनियमितता करणार नाही असा बँकेचा आत्मविश्वास वाढू शकतो.

दुसरा मार्ग म्हणजे क्रेडिट स्कोअर खराब असेल तर मालमत्ता गहाण ठेवून वैयक्तिक कर्ज घेतले जाऊ शकते. हे फक्त हमीदारासारखे आहे. यात गॅरेंटरऐवजी, तुम्हाला काही मालमत्ता बँकेकडे ठेवावी लागेल, जी कर्जासोबत जोडली जाईल. कर्जाची परतफेड केली नाही तर बँक गहाण ठेवलेली मालमत्ता विकू शकते.

तिसऱ्या पर्यायाबद्दल सांगायचे तर, समजा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप दाखवून बँकेकडून कर्ज घेता येईल. जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी असाल तर बँका सहज कर्ज मंजूर करतात. पण हे लक्षात ठेवा की ही पद्धत पूर्णवेळ नोकरी असलेल्यांसाठी चांगली कार्य करते.

Leave a Comment