CIBIL Score : गृहकर्ज घेताय? त्यापूर्वी जाणून घ्या CIBIL स्कोर, नाहीतर बसेल आर्थिक फटका

CIBIL Score : अनेकजण गृहकर्ज घेतात. पण गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा CIBIL स्कोर तपासाला पाहिजे. नाहीतर तुम्हाला त्याचा खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कसे ते जाणून घ्या.

किती असावा क्रेडिट स्कोअर?

तुम्हाला सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज घ्यायचे असल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा. बहुतेक बँका 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानतात. पण काही बँकांद्वारे 700 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.

कमी व्याज दर: हे लक्षात घ्या की समजा तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असल्यास आणि बहुतेक बँका तुम्हाला सुरुवातीच्या व्याजदराने कर्ज देतील. असे झाले तर तुमचे खूप पैसे वाचतील.

जास्त कर्ज: समजा तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला बँकांकडून मोठ्या रकमेचे कर्ज सहज मिळेल. जर तुम्हाला मोठ्या रकमेचे कर्ज हवे असल्यास संयुक्त कर्जाद्वारे अर्ज करणे एक चांगला मार्ग आहे.

त्वरीत कर्जाची होते मंजूरी: तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर, तुमचे कर्ज मंजूर होण्याची शक्यता देखील वाढते. बँकेला असे वाटते की तुम्हाला कर्ज देताना डिफॉल्ट होण्याचा धोका खूप कमी आहे. यामुळे कर्ज पडताळणीला देखील खूप कमी वेळ लागतो.

असा सुधारा CIBIL स्कोअर

सर्व बँक खाती पॅन कार्डशी जोडली असल्याने CIBIL ला आधीच अस्तित्वात असलेली शिल्लक आणि कर्जाची माहिती असेल. वेळोवेळी CIBIL स्कोअरची गणना करणारा डॅशबोर्ड तपासणे आणि अपडेट करा.

क्रेडिट कार्डवरील खर्च

समजा एखाद्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर कोणत्याही क्रेडिट कार्डवरील 30% मर्यादा ओलांडू नका. जरी क्रेडिट कार्ड मर्यादा खूप जास्त असू शकते आणि वापरकर्ता जोपर्यंत वेळेवर पेमेंट करत आहे तोपर्यंत त्याचा पुरेपूर फायदा घ्या. एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादेच्या फक्त 30% वापरणे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे आहे.

देय रक्कम

क्रेडिट कार्ड आणि EMI वर एक दिवसाचा विलंब तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करतो, हे लक्षात ठेवा. कर्जदारांनी पेमेंट चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी ऑटो-डेबिट सेवा सेट करा. कोणतेही अतिरिक्त खर्च नसले तरीही, क्रेडिट कार्डची बिले कधीही वाढवू नयेत आणि ती नेहमी पूर्ण भरा.

Leave a Comment