दिल्ली : चीनचे पंतप्रधान ली क्विंग (Li Keqiang) यांनी शुक्रवारी रशिया आणि युक्रेनमधील युद्धविराम करारासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. कोविड-19 जागतिक संकटाच्या प्रभावातून सावरणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला ते नुकसान करतील, असे म्हणत त्यांनी रशियाविरुद्ध अमेरिका आणि युरोपियन युनियन निर्बंधांना विरोध केला. युक्रेनमधील सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून चीनचे पंतप्रधान म्हणाले की, सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणे किंवा चिथावणी देणे टाळून तणाव कमी करण्याची गरज आहे.
ते म्हणाले, की संयम बाळगणे आणि युक्रेनमधील मोठे संकट थांबवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करण्यास तयार आहे. चीनने नेहमीच शांततेसाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे पालन केले आहे आणि कधीही कोणत्याही तृतीय पक्षाला लक्ष्य केलेले नाही.
युक्रेन नाटो (NATO) मध्ये सामील झाल्याबद्दल रशियाच्या काळजीचा संदर्भ देताना, ते म्हणाले की सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करताना, देशांच्या कायदेशीर सुरक्षेची चिंता देखील गांभीर्याने घेतली पाहिजे. ली म्हणाले की, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या घोषणेची उद्दिष्टे आणि तत्त्वे पाळली गेली पाहिजेत आणि सर्व देशांच्या कायदेशीर चिंता गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. ते म्हणाले, की कोविड-19 मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. या निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होईल. हे कोणाच्याही हिताचे नाही.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केल्यापासून चीनने या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तटस्थ भूमिका घेतली आहे आणि रशियाच्या कारवाईला हमला म्हणून स्वीकारण्यास आणि त्याचा निषेध करण्यास नकार दिला आहे. असे असले तरी देखील चीन दुसरीकडे युक्रेनलाही मदत देत आहे. युक्रेनला मानवतावादी मदत देणार असल्याची घोषणा चीनने केली आहे.
Russia Ukraine War : रशिया विरोधात नवा प्लान; पहा, आता काय करणार युरोपातील देश..
चीनने ऐनवेळी दिला मदतीस नकार; रशियाला आता भारताचाच आधार; पहा, आता भारत काय करणार..?