नवी दिल्ली : चाळीस पेक्षा जास्त अमेरिकन सिनेटर्सच्या द्विपक्षीय गटाने चीनला तेथे सुरू असलेल्या आंदोलनांवर कोणत्याही हिंसक कारवाईविरूद्ध इशारा दिला आणि म्हटले, की ते अमेरिका-चीन संबंधांचे नुकसान करेल. डेमोक्रॅट्स डॅन सुलिव्हन, जेफ मर्कले आणि रिपब्लिकन मिच मॅककोनेल, टॉड यंग यांच्या नेतृत्वात 42 सिनेटर्सनी चीनचे वॉशिंग्टनमधील राजदूत किन गँग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ते चीनमधील प्रदर्शनांवर अत्यंत काळजीपूर्वक नजर ठेऊन आहेत. आम्ही चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) प्रतिसादावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,” असे सिनेटर्सच्या पत्रात म्हटले आहे.
याआधी अमेरिकेने चीनमध्ये सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. हा तिथल्या लोकांचा हक्क आहे, म्हणून तो त्यांच्या पाठीशी उभा आहे. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही अमेरिकेने म्हटले होते. व्हाईट हाऊसच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनचे को-ऑर्डिनेटर जॉन किर्बी यांनी चीनच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, अमेरिकेचा संपूर्ण जगाला संदेश आहे की प्रत्येकाला बोलण्याचा आणि शांततेने निषेध करण्याचा अधिकार आहे. चीनमधील आंदोलकांवर कठोरतेबद्दल ते म्हणाले की लोकांना त्यांचे अधिकार वापरण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.
चीनमध्ये सरकारच्या शून्य-कोविड धोरणाविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. आंदोलक शहरांमधून लॉकडाऊन हटवण्याची मागणी करत असतानाच ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही पायउतार होण्यास सांगत आहेत. चीनच्या जवळपास डझनभर शहरांमध्ये अशी निदर्शने होताना दिसत आहेत. अमेरिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, अशी ग्वाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, सध्या ते चीनला कोणतीही ऑफर देऊ इच्छित नाहीत. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कोरोना लसीचा पुरवठादार देश आहे. सध्या चीनकडून अमेरिकन लसीबाबत कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही.
- वाचा : चीनमध्ये कोरोनाचे थैमान..! सरकारी कठोर निर्बंधानंतरही सापडले तब्बल ‘इतके’ बाधित
- अमेरिकेने ‘त्या’ चीनी लोकांना दिला पाठिंबा; चीन सरकारलाही दिला ‘हा’ पर्याय; जाणून घ्या, अपडेट..