China Taiwan Tension : नवी दिल्ली : चीनच्या तैवानबाबतच्या दृष्टिकोनात (China Taiwan Tension) विशेष बदल झालेला नाही. हे रविवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. ज्यात त्यांनी तैवानला (Taiwan) इशारा दिला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीच्या सुरुवातीच्या भाषणात जिनपिंग यांनी स्पष्टपणे सांगितले की, तैवानच्या बाबतीत बळाचा वापर करण्यास आम्ही कधीही मागे हटणार नाही. मात्र, हा प्रश्न चीनचे (China) लोक सोडवतील आणि त्यावर शांततापूर्ण तोडगा काढू इच्छितो, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, तैवाननेही चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याला चोख (Taiwan Reply To China) प्रत्युत्तर दिले आहे. आपले सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि लोकशाहीशी तडजोड करणार नसल्याचे तैवानने स्पष्ट केले आहे.
जिनपिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय एकात्मतेचे ऐतिहासिक चाक पुढे सरकत आहे. मातृभूमीच्या संपूर्ण एकात्मतेचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी तैवानला भेट दिल्यानंतर चीनची भूमिका याबाबत अतिशय आक्रमक आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो, अशा स्थितीत अमेरिकेचा हस्तक्षेप त्याला अजिबात आवडत नाही. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर चीनने तैवानच्या सीमा भागात लढाऊ विमाने उडवली होती. आता चीनच्या या लष्करी कारवाया कमी झाल्या असतील, पण त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
बीजिंगमध्ये झालेल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या उद्घाटनाच्या भाषणात जिनपिंग म्हणाले की, चीनने नेहमीच तैवानच्या लोकांचा आदर केला आहे आणि त्यांचे हित जपले आहे. ते तैवानमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहेत. यावेळी ते म्हणाले की, तैवानचा प्रश्न सोडवणे हे चीनच्या लोकांचे काम आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण शांततेने सोडविण्याच्या बाजूने आम्ही नेहमीच आहोत. मात्र कुठेही बळाचा वापर झाल्यास आम्ही मागे हटणार नाही. ते म्हणाले की, बाहेरील शक्तींचा हस्तक्षेप आणि तैवानच्या स्वातंत्र्याचे मूठभर समर्थक आमच्या निशाण्यावर आहेत.
जिनपिंग यांच्या वक्तव्यावर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून एक निवेदन आले आहे. तैवान आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यात म्हटले आहे. लोकशाही, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोन्ही बाजूंना युद्ध हा पर्याय नसल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. निवेदनानुसार, ही तैवानच्या लोकांची सहमती आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींवर सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
- Must Read : Corona In China : अर्र.. चीनमध्ये पुन्हा कोरोना रिटर्न; पहा, चीनी सरकारने काय काय केले बंद ?
- China Taiwan Tension : ‘त्या’ मुद्द्यावर चीनने पुन्हा धमकावले.. अमेरिकेचे नाव न घेता दिला ‘हा’ गंभीर इशारा
- China : अर्र.. दोघांच्या भांडणात चीन होतोय मालामाल; पहा, ‘कसे’ फसवले जाताहेत ‘ते’ श्रीमंत देश..
- China : चीनी विमानांनी दिला झटका..! ‘या’ देशाने नाईलाजाने घेतला ‘हा’ निर्णय; पहा, कसे बिघडले बजेट ?