China Taiwan Tension : तैवानने पुन्हा चीनला धमकावले! पहा, चीनने नेमकं काय केलं?

China Taiwan Tension : चीन तैवान यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे सध्या (China Taiwan Tension) तरी दिसत नाहीत. आताही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे दोन्ही देशातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या शनिवारी तैवाने सलग (Taiwan) दुसऱ्या दिवशी तैवान सामुद्रधुनी चिनी जहाजांच्या घोसखोरीवर तीवर आक्षेप व्यक्त केला. चिनी जहाजे आत शिरताच तैवाने रेडिओद्वारे या जहाजांना ताबडतोब परत जाण्याचा इशारा दिला.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने तैवानच्या तटरक्षक दलाच्या हवाल्याने सांगितले की शनिवारी सकाळी चार चिनी तटरक्षक (China) लोकांनी तैवान नियंत्रित किनमेन बेटांवर प्रतिबंधित सागरी हद्दीत प्रवेश केला होता तैवांच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही चिनी नौका तासभर संवेदनशील भागात होत्या. खरे तर तैवानचा तीव्र आक्षेप असूनही चीन नेहमीच तैवानला आपल्या देशाचा भाग म्हणून समजतो. अलीकडच्या काळात चीनने तैवानजवळ लष्करी हालचाली देखील वाढविल्या आहेत.

Russia President Election : रशियातही निवडणुकांची धामधूम; मतदान सुरू, कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

China Taiwan Tension

तैवान कोस्ट गार्डन जारी केलेल्या फुटेजनुसार तैवानच्या एका अधिकाऱ्याने रेडिओद्वारे चिनी अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही आमच्या देशाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला आहे. कृपया ताबडतोब इथून निघून जा. या फुटेजमध्ये तैवान कोस्टगार्डच्या दोन नौका दोन चिनी जहाजांच्या हालचालीवर नजर ठेवत असल्याचे दिसत आहे. तैवान तटरक्षक दलाने एका निवेदनात म्हटले आहे की चीनच्या या कारवाईचा वाहतूक आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला आहे. या घटना टाळण्यासाठी आम्ही त्यांना असे वर्तन थांबवण्याचे आवाहन करतो. सध्या या मुद्द्यावर चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तैवान अधिकृत सेंट्रल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या तटरक्षक दलाने शुक्रवारी किंगमेन बेटांजवळ गस्त घातली चीनच्या चार तटरक्षक नौकांना तैवानने इशारा दिला होता. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार अलीकडेच किनमेन बेटांवर दोन चिनी मच्छीमारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चिनी तटरक्षक दल नियमितपणे या भागात लक्ष ठेवून असते.

China Taiwan Tension

तैवानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने रायटर्सला सांगितले की चीन तैवानला त्रास देत आहे आणि गोंधळात टाकणारे मेसेज पाठवत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की किनमेनमधील चिनी गस्तीमुळे कोणताही मोठा सुरक्षेचा धोका नाही परंतु तेथील परिस्थिती गुंतागुंतीची बनलेली आहे.

Philippines China Dispute : 11 कोटी लोकसंख्येचा देश पण, थेट चीनला भिडला; पहा, काय घडलं चीनी समुद्रात?

1 thought on “China Taiwan Tension : तैवानने पुन्हा चीनला धमकावले! पहा, चीनने नेमकं काय केलं?”

Leave a Comment