China Taiwan Conflict : तैवानच्या संकटात चिन्यांनी साधला डाव; पहा, काय केलाय कारनामा?

China Taiwan Conflict Create Again : बुधवारी सकाळी तैवान मध्ये शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप (Taiwan Earthquake) इतका शक्तिशाली होता की शहरातील इमारती पत्त्याच्या (China Taiwan Conflict Create Again) बंगल्याप्रमाणे कोसळल्या. रस्तेही खचले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या संकटाचा सामना करत असतानाच तैवानला आणखी एका संकटाला सामोरे जावे लागले. या संकटाच्या काळात चीनने पुन्हा तैवानची खोडी काढली.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे, की तैवानच्या सीमेजवळ चीनची 30 लढाऊ विमाने आणि 9 नौदलाचे जहाजे सापडले आहेत. भूकंपानंतर तासाभराने तैवानने हा दावा केला होता. 24 तासांच्या आत सीमेवर आलेल्या जहाजांची संख्या या वर्षात सर्वाधिक आहे. चीन सतत तैवानवर आपला भूभाग असल्याचा दावा करत आहे. परंतु तैवानने या दाव्याला कधीही मान्यता दिली नाही त्यामुळे या दोन्ही देशात संघर्ष कायमच सुरू असतो.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की 20 चीनी विमानांनी (Fighter Jet) एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन पार केले. तैवानच्या मंत्रालयाने याबाबत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून तैवानच्या सैन्याने (Taiwan Army) या चिनी घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याची तैनाती केली आहे.

Canada Accused Pakistan : कॅनडाच्या निशाण्यावर पाकिस्तान; सरकारच्या ‘त्या’ दाव्याने पाकिस्तानात खळबळ!

China Taiwan Conflict

सध्या याबाबत चीनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तैवानच्या आसपासचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काही चिनी जहाजे दिसत आहेत. काल तैवानलाही सीमेवर चिनी उपग्रह प्रक्षेपित झाल्याचे आढळून आले होते. तज्ज्ञ या प्रकारच्या घुसखोरीला ग्रे झोन कारवाई असे नाव देत आहेत. या अशा हालचाली आहेत ज्या सर्वांगीण युद्धापेक्षा कमी नसतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 2016 पासून तैवानमध्ये चिनी घुसखोरी वाढली आहे. चीन जवळजवळ दररोज तैवानजवळ अशा कारवाया करत असतो. तैवानच्या सागरी क्षेत्रात नियमितपणे जहाजावर पाळत ठेवण्याचे काम चीनकडून केले जाते. तैवानमध्ये 25 वर्षानंतर सर्वात शक्तिशाली भूकंप आज झाला होता. या भूकंपात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न तैवानकडून सुरू असतानाच चीनने ही खोडी काढली आहे. चीनच्या विमानांनी घुसखोरी केल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अजून खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही तसेच चीन सरकारनेही यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

China Taiwan Conflict

दरम्यान, आज सकाळी तैवानमध्ये अतिशय शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. मागील काही वर्षातील हा अतिशय शक्तिशाली असा भूकंप होता. या भूकंपामुळे मोठ्या आणि अतिशय मजबूत इमारती अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळल्या. रस्तेही खचले गेले. या घटनेत बरेच लोक जखमीही झाले.

Leave a Comment