China Sri Lanka Relation : चीनच्या हेरगिरी करणाऱ्या जहाजांचा भारताला नेहमीच (China Sri Lanka Relation) धोका असतो. दक्षिण आशियातील अनेक देश चीनच्या प्रभावाखाली (China) आहेत. या देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्यांचा हवा तसा वापर करून घेण्याचे उद्योग चीनने सुरू केले आहेत. हिंद महासागरात चिनी (Sri Lanka) हेरगिरी जहाजे बऱ्याच दिवसांपासून ठाण मांडून आहेत. याचा धोका भारताला वाटतो आहे. त्यामुळेच या जहाजांबाबत भारताने (India) श्रीलंकेला अनेकदा इशारा दिला आहे. यावेळी तर भारताने थेट आदेशच दिला होता. श्रीलंकेनेही या आदेशाचे पालन करत चिनी जहाजांना हिंद महासागरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यावरून चीनचा जळफळाट झाला असून त्याने सरळ धमकीच देऊन टाकली आहे.
श्रीलंकन वृत्त आउटलेट डेली मिररमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेने 3 जानेवारी 2024 पासून एका वर्षासाठी हिंदी महासागरातील विशेष आर्थिक क्षेत्रात चीनी हेरगिरी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. श्रीलंकेच्या या निर्णयावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. अहवालानुसार श्रीलंकेने अशा सर्व जहाजांवर बंदी घातली असली तरी चीनला सर्वाधिक फटका बसला आहे. चीनचे संशोधन जहाज जियांग यांग हाँग-3 हे दक्षिण हिंदी महासागर संशोधनासाठी येत असताना श्रीलंकेने हा निर्णय घेतला आहे.
World Population : ‘या’ देशांची लोकसंख्या घटली; सरकारचंही वाढलं टेन्शन, पहा, काय घडतंय?
China Sri Lanka Relation
चीनने श्रीलंकेवर आरोप केले
चीनचे जियांग जहाज अधिकृतपणे चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाशी संबंधित असल्याचे वर्णन केले जाते. संशोधनाच्या नावाखाली चीन श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात येऊन हेरगिरी करतो, असा आरोप भारताने नेहमीच केला आहे. श्रीलंकेच्या बंदीवर चिनी अधिकारी संतापले आहेत. भारताच्या इशाऱ्यावर श्रीलंकेने चुकीचे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले. या निर्णयावर चिनी प्रसारमाध्यमांनीही श्रीलंकेवर जोरदार टीका केली आहे.
China Sri Lanka Relation
मात्र जागेअभावी चिनी जहाज मालदीवच्या बंदरात थांबले. आता मालदीवमधून चिनी जहाज रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. चीनने सांगितले की त्यांचे जियांग यांग हाँग-3 जहाज मालदीवमध्ये सागरी कर्मचाऱ्यांसाठी गेले होते. या जहाजाचे वजन 4500 टन असल्याचे सांगितले जाते.
मालदीवच्या वृत्तानुसार, चिनी जहाज जियांग यांग हाँग-3 मालदीवच्या माले बंदरात थांबले होते. आता ते मालदीवच्या विशेष आर्थिक समुद्री कॉरिडॉरकडे रवाना झाले आहे. हे जहाज बंदर सोडल्यानंतर दोन दिवसांनी मालदीवच्या परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. जहाज ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, दोन दिवसांनंतरही जहाज मालदीवची राजधानी मालेपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर हुलहुमालेजवळ असणे अपेक्षित आहे.
Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड! पंतप्रधान पदासाठी’या’ नेत्याचं नाव फायनल