China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

China PLA War : चीनच्या कारवायांनी जगातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. कर्जाच्या (China PLA War) सापळ्यात अनेक देशांना अडकवण्यात चीन यशस्वी झाला आहे. मोठ्या आर्थिक मदतीचे अमिष दाखवून या देशांच्या राजकारणातही चीनचा (China News) हस्तक्षेप वाढू लागला आहे. ज्या देशांनी चीनच्या जाळ्यात फसण्यास नकार दिला त्यांना धकावण्याचे प्रकारही चीनकडून केले जात आहेत. यामुळेच चीनचे अनेक देशांबरोबर वाद सुरू आहेत. आताही चीनने असाच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे जगाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

चीन सध्या सैन्याला अधिक बळकट करण्याच्या दिशेने काम करत आहे. याआधीही चीनने संरक्षण बजेटमध्ये (Chinese Army Budget) मोठी वाढ केली होती. चीनी आर्मीनुसार देश-विदेशात अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने संरक्षण बजेटमधील बहुतांश रक्कम लष्कराला युद्धासाठी तयार करण्यासाठी खर्च केली जाईल. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात पीएलए प्रतिनिधी मंडळाचे प्रवक्ते वू कियान यांनी सांगितले की देशाच्या सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक क्षमता सुधारणांचे उद्दीष्ट आहे. सैन्यावरील खर्चाच्या बाबतीत चीन अमेरिकेनंतर (America) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

China PLA War

China News : जिनपिंग आणखी शक्तिशाली; चीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी टाकला ‘हा’ मोठ्ठा डाव!

चीनचे पंतप्रधान ली कियांग म्हणाले, लष्करी खर्च 7.2 टक्क्यांनी वाढून 1.69 ट्रिलियन युआन (235 अब्ज डॉलर्स) झाला आहे, असे वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे. पीएलए प्रतिनिधी मंडळाचे प्रवक्ते वू कियान म्हणाले, पीएलए (पीपुल्स लिबरेशन आर्मी) कमी बजेटसह उच्च कार्यक्षमता आणि कमी वापराच्या संकल्पनेला बळकट करेल. चीनचा खर्च जीडीपी आणि एकूण सरकारी खर्च तसेच दरडोई लष्करी खर्चाच्या गुणोत्तराच्या दृष्टीने रास्त आहे.

यानंतर वू कियान यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. ते म्हणाले, अमेरिकेचा हस्तक्षेप बरोबर नाही. तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष विल्यम लाई चिंग-ते यांनाही इशारा दिला.ड आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यास तयार आहोत आणि शांततापूर्ण एकीकरणाच्या शक्यतेसाठी प्रयत्नशील आहोत. परंतु, तैवानच्या स्वातंत्र्याच्या किरकोळ कारवाया सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही, असे कियान यांनी सांगितले. China PLA War

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

1 thought on “China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च”

Leave a Comment