China News : बेलगाम हुकुमशाही असलेल्या चीनने (China) पुन्हा एकदा तैवानला (Taiwan) जोरदार झटका दिला आहे. एकीकडे पाश्चात्य देश रशियाची (Russia) कोंडी करण्याच्या प्रयत्नात रशियाला शस्त्रपुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध लादत आहेत तर दुसरीकडे चीनने तैवानला शस्त्रपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायाला नख (China Vs America) लावण्याचे काम सुरू केले आहे. चीनने गुरुवारी लॉकहीड मार्टिन कॉर्प आणि रेथिऑनवर मिसाइल्स अँड डिफेन्स कंपन्यांद्वारे चीनकडून सामान आयात करणे आणि देशातील नवीन गुंतवणुकीवर बंदी घातली आहे.
देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की या दोन्ही कंपन्यांना गैर-विश्वासार्ह यादीत टाकण्यात आले आहे.कारण ते राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास हित धोक्यात आणू शकतात. चीन या निर्णयांद्वारे तैवानला वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.१९४९ मध्ये गृहयुद्धानंतर चीन आणि तैवान वेगळे झाले.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
अहवालानुसार सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे आहे की, चीनमध्ये तैवानचा समावेश करूनच आम्ही थांबणार आहोत.त्यासाठी मग बळाचा वापर करावा लागला तर मागेपुढे पाहिले जाणार नाही. अशा परिस्थितीत चीनची फायटर आणि बॉम्बर विमाने युद्धाभ्यास करत तैवानला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिका तैवानच्या लष्करी उपकरणांचा मुख्य पुरवठादार आहे हे स्पष्टच आहे. त्यामुळे चीनच्या अशा निर्णयांचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच (America) बसणार आहे. त्यामुळे आता या घडामोडींवर अमेरिका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.