China News : जिनपिंग आणखी शक्तिशाली; चीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी टाकला ‘हा’ मोठ्ठा डाव!

China News : भारताचा जागतिक प्रतिस्पर्धी चीनमधून (China News) मोठी बातमी समोर आली आहे. चीनच्या संसदेने चिनी कम्युनिस्ट पक्षाला अधिक शक्तिशाला बनवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळावर आता कम्युनिस्ट पक्षाचे जास्त नियंत्रण राहणार आहे. या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग (Xi Jinping) यांच्या अधिकारांचा विस्तार होणार आहे. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षांच्या काळात पहिल्यांदाच पंतप्रधानांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

देशाच्या राजकीय व्यवस्थेत पंतप्रधानपद दुसऱ्या क्रमांकाचे पद होते. सोमवारी चीनची राजधानी बीजिंग शहरात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या शेवटच्या दिवशी 2 हजार 883 प्रतिनिधींनी सुधारित राज्य परिषद संघटना कायद्याच्या बाजूने मतदान केले. तर आठ प्रतिनिधींनी विरोधात मतदान केल. नऊ प्रतिनिधी मात्र गैरहजर राहिले.

Philippines China Dispute : 11 कोटी लोकसंख्येचा देश पण, थेट चीनला भिडला; पहा, काय घडलं चीनी समुद्रात?

China News

अशा पद्धतीने आता शी जिनपिंग यांचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेवर एकमत झाले आहे. पंतप्रधान ली कियांग यांच्या नेतृत्वातील राज्य परिषदेचे अधिकार हळूहळू काढून घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. त्यात आजच्या निर्णयाची भर पडली.

सन 1982 नंतर अशी पहिलीच वेळ आहे की राज्य परिषदेने संघटीत कायद्यांच्या दुरुस्तींद्वारे अधिकार सातत्याने पक्षाकडे हस्तांतरीत केले जात आहेत. जेणेकरून पक्षाने केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिषदेला पक्षाच्या नावाने राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले जाईल. हाँगकाँग विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक रायन मिशेल यांनी सांगितले की चीनच्या कार्यकारी अधिकाराच्या पुनर्रचनेत हा महत्वाचा बदल करण्यात आला आहे. China News

China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा

 

Leave a Comment