China Moon Mission | चीनची चंद्राच्या दिशेने झेप; नव्या मोहिमेचा प्लॅन ऐकून वाटेल आश्चर्य..

China Moon Mission : चीनने शुक्रवारी आपली नवीन चंद्र मोहीम चांग ई 6 यशस्वीरित्या (China Moon Mission) प्रक्षेपित केली. या चिनी चंद्र मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या सुदूर क्षेत्रातून दोन किलो वजनाचे नमुने गोळा करण्याचे आहे. यासाठी चिनी अंतराळ (China News) संस्थेने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वेंगचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून रोबोटिक चंद्र मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. चीनची ही मोहीम 53 दिवस सुरू राहणार आहे. या दरम्यान चीनचा रोबोट चंद्राच्या अंधारलेल्या भागातून दोन किलो नमुने विश्लेषणासाठी गोळा करणार आहे.

चीनची स्पेस एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे की जर चीनची ही मोहीम (Moon Mission) यशस्वी ठरली तर चीनसाठी अंतराळातील ही एक मोठी उपलब्धी असेल. कारण आतापर्यंत कोणत्याही देशाने इतक्या दूरवरच्या भागातून नमुने पृथ्वीवर आणलेले नाहीत. चीनने या मोहिमेला चांग ई 6 असे नाव दिले आहे. चीनला अपेक्षा आहे की त्यांचे हे अभियान यशस्वी होईल.

China Maldives Relation | चीनची खोडी! हिंद महासागरात केला नवा कारनामा; मालदीवनेही दिली साथ

China Moon Mission

वास्तविक चंद्र मोहीमबाबत चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे. चीन आणि अमेरिके एकापाठोपाठ एक चंद्र मोहिमा लाँच करत आहेत. सन 2019 मध्ये चीनचे चांग ई 4 मोहीम चंद्रावर यशस्वीरित्या राबविण्यात आली होती. यानंतर चीनने पुन्हा 2020 मध्ये चांग 5 मिशन लॉन्च केले होते. तथापि चीनच्या आताच्या चांद्र मोहिमेचे मापदंड अधिक महत्त्वकांक्षी आणि वैज्ञानिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीचे आहेत. चंद्राच्या दूरच्या बाजूने दोन किलोग्रॅमपर्यंतचे रेगोलिथ पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट या मोहिमेत ठेवण्यात आले आहे.

सन 2030 पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेला चंद्रावर जाण्यास उशीर होत असल्याचे नासाने आधीच स्पष्ट केले आहे. परंतु 2026 पर्यंत अमेरिका चीनच्या आधी चंद्रावर पोहोचेल. चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन चीनची सरकारी संस्था आहे चीनच्या या मोहिमेसाठी अंमलबजावणीचे काम या संस्थेवर आहे. अंतराळ संस्थेचे मुख्यालय बीजिंगमधील हैडियन भागात आहे. चीनची ही एजन्सी नागरी अंतराळ प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यासाठी जबाबदार आहे.

China Moon Mission

China Taiwan Conflict : तैवानच्या संकटात चिन्यांनी साधला डाव; पहा, काय केलाय कारनामा?

Leave a Comment