China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा

China Maldives Relation : भारताबरोबर संबंध बिघडल्यानंतर आता मालदीव चीनकडे (China Maldives Relation) झुकला आहे. चीननेही या संधीचा फायदा घेत मालदीवला मदत (India Maldives Row) करण्यास सुरुवात केली आहे. चीनने दोन्ही देशांतील (China) द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने मोफत लष्करी मदत देण्यासाठी मालदीवबरोबर संरक्षण सहकार्य करारावर सही केली. काही दिवसांपूर्वी मालदीव सरकारने (Maldives) त्यांच्या देशातील भारतीय सैन्याला माघारी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चीन आणि मालदीवमधील सहकार्याची ही मोठी घडामोड घडली आहे. दोन्ही देशांत होत असलेली मैत्री आगामी काळात भारतासाठी तापदायक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Nepal : नेपाळमध्ये चीनी पॉलिटिक्स! जुनी युती तोडली; PM प्रचंड ‘या’ चीन समर्थकाबरोबर करणार आघाडी

एका न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे की चीनने मालदीवला 12 इको फ्रेंडली रुग्णवाहिका दिल्या आहेत. मालदीवच्या आरोग्य मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी मालदीवला यासंबंधी पत्र दिले. अलीकडेच मालदीवनेही चीनी हायटेक संशोधन जहाज जियांग यांग हाँगला माले बंदरात उतरण्याची परवानगी दिली होती.

China Maldives Relation

याच जहाजाला हिंद महासागरात जाण्यास श्रीलंकेने (Sri Lanka) परवानगी नाकारली होती. त्यामुळे या जहाजाला नाईलाजाने मालदीवला जावे लागले. कोणत्याही संशोधन जहाजाला आमच्या आर्थिक क्षेत्रात प्रवेशाची परवानगी नाही असे श्रीलंका सरकारने चीनला ठणकावून सांगितले होते. भारताच्या इशाऱ्यावरून श्रीलंकेने हा निर्णय घेतल्याचे चीनला वाटत आहे.

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

China Maldives Relation

दुसरीकडे भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजूनही कमी झालेला नाही. आता मालदीव सरकारने भारतीय सैनिकांना त्यांच्या देशातून निघून जाण्यास सांगितले आहे. मालदीवमध्ये नागरी पोशाखात भारतीय कर्मचारी नसतील असे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. तर याआधी तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जागी लष्करी कर्मचारी नियुक्त करण्याचे मान्य करण्यात आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यावर मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.  त्यांच्या या वक्तव्यानंतर संतापलेल्या भारतीयांनी मालदीवचा बहिष्कार करण्यास सुरुवात केली होती. या बहिष्कारामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. यानंतर सरकारने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई देखील केली होती. तेव्हापासून मालदीव आणि भारत या दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.  China Maldives Relation

Leave a Comment