China Maldives Relation : जवळपास साडेचार हजार टन वजनाचे हायटेक चिनी (China Maldives Relation) संशोधन जहाज मालदीवच्या समुद्रिक क्षेत्रात परतले आहे. याआधी दोन महिने मालदीवच्या विविध बंदरांवर या जहाजाने एक आठवडा घालवला होता. मालदीवच्या अधाधू या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जियांग यांग हाँग 3 नामक जहाज गुरुवारी सकाळी मालदीवच्या समुद्री क्षेत्रात बंदरात आले होते. मात्र मालदीव सरकारने हे जहाज परत का आले याचे कारण अजून सांगितलेले नाही. परंतु सरकारने जहाजाला त्याच्या पहिल्या प्रवासापूर्वी डॉक करण्याची परवानगी दिल्याची खात्री केली आहे.
चीन समर्थक मुइज्जू यांच्या नेतृत्वातील पीपल्स नॅशनल काँग्रेसने मालदीवच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत भारत विरोधी प्रचार करण्यात आला होता. यानंतर चीन आणि मालदीव यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील असे सांगण्यात येत आहे. त्याचा अनुभव लगेचच आला आहे. चीनचे जहाज एक्स्क्लुजिव इकॉनॉमिक झोन पार करून परतले आहे. म्हणून जियांग यांग हाँग 3 जहाज जानेवारी महिन्यापासून मालदीवमध्ये किंवा त्याच्या जवळपासच्या क्षेत्रात सक्रिय आहे. याआधी 23 फेब्रुवारी रोजी मालदीवची राजधानी मालेपासून साडेसात किलोमीटर अंतरावरील एका बंदरावर थांबले होते.
Maldives Election | मालदीवमध्ये चीन समर्थकांचा विजय, भारताला धोक्याची घंटा; पहा, काय घडलं?
China Maldives Relation
मालदीवच्या इकॉनॉमिक झोनच्या सीमेजवळ एक महिना व्यतीत केल्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी जहाज मालदीवच्या समुद्री क्षेत्रात पोहोचले. सहा दिवसांनंतर जहाज इकॉनॉमिक झोन सीमेजवळ परतले. फेब्रुवारीमध्ये मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की चीन सरकारने मालदीव सरकारला केलेल्या राजनैतिक विनंतीनंतर जहाज आपल्या कर्मचारी रोटेशन आणि पुन्हा पुरवठा करण्यासाठी येथे आले होते.
याआधी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने जानेवारी महिन्यात सांगितले होते की चिनी जहाज मालदीवच्या समुद्री क्षेत्रात कोणतेही संशोधन कार्य करणार नाही. मालदीवची भारताशी जवळीक लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटापासून जेमतेम 70 नॉटिकल मैल आणि मुख्य भूमीच्या पश्चिम किनाऱ्यापासून 300 नॉटिकल मैल आहे. हिंद महासागर क्षेत्रातून जाणारे व्यावसायिक सागरी मार्गांच्या केंद्रस्थानी असलेले त्याची जागा त्याला महत्त्वाचे धोरणात्मक महत्त्व देते.
China Maldives Relation
India China Relations : चीनचा डाव! भारतानेही दिले रोखठोक उत्तर; पहा, पुन्हा का धुमसतोय भारत-चीन वाद?