दिल्ली – क्वाड कॉन्फरन्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानबाबत (Taiwan) केलेल्या वक्तव्यामुळे चीन संतापला आहे. चीनला कमकुवत समजण्याची चूक कोणत्याही देशाने करू नये. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तैवानच्या प्रश्नावर जो बायडेन यांच्या वक्तव्यावर असंतोष व्यक्त केला. ते म्हणाले की, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित मुद्द्यांवर चीनमध्ये (China) तडजोडीला जागा नाही. कोणत्याही देशाने चिनी लोकांच्या निर्धाराला कमी लेखू नये. वास्तविक, जो बायडेन (Jo Biden) यांनी तैवानबद्दल म्हटले होते की, जर चीनने तैवानवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन सैन्य तैवानला लष्करी मदत देईल.
जो बायडेन यांनी तैवानवर चीनच्या कब्जाच्या शक्यतेबद्दल सांगितले की, चीन विनाकारण वाद उकरून काढत आहे. वास्तविक जो बायडेन यांना विचारण्यात आले होते, की जर चीनने तैवानवर हल्ला (China Attack On Taiwan) केला तर अमेरिका तैवानच्या रक्षणासाठी लष्करी मदत देईल का ? प्रत्युत्तरादाखल बायडेन म्हणाले की अगदी बरोबर, आम्ही तीच प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष म्हणजे, चीनची वाढती आर्थिक आणि लष्करी ताकद आणि तैवानवर ताबा मिळण्याची भीती असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदाच अशी कठोर टिप्पणी केली आहे. चीनच्या संभाव्य एकतर्फी लष्करी कारवाईवर अमेरिका आणि जपानने (Japan) संयुक्तपणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचवेळी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाला पाठिंबा दिल्याबद्दल दोन्ही देशांनी चीनचा निषेधही केला आहे. अमेरिका आणि जपान यांनी संयुक्तपणे चीन आणि रशियाच्या नौदल सराव आणि नौदल हालचालींवर लक्ष ठेवण्याचे मान्य केले आहे.
यानंतर बायडेन आणखी पुढे गेले. तैवानचे रक्षण करण्यासाठी अमेरिका सैन्यारुपाने सहभागी होण्यास तयार आहे का, असे विचारले असता, त्यांनी उत्तर दिले “होय. त्यासाठीच आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही एक चीन धोरणाशी (One China Policy) सहमत आहोत. आम्ही त्यावर स्वाक्षरी देखील केली. मात्र, जबरदस्तीने हे साध्य करणे योग्य नाही. यामुळे येथील परिसरात अशांतता निर्माण होईल आणि युक्रेनसारखी (Ukraine) परिस्थिती निर्माण होईल.
बायडेन यांच्या दौऱ्यामुळे चीन भडकला..! चीनी समुद्रात सुरू केलाय ‘हा’ प्रकार; जाणून घ्या..