Agriculture In Space : आपल्या अनोख्या प्रयोगांसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या चीनने (China) अवकाशात (Space) मोठी कामगिरी केली आहे. चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्स (CAS) ने आपल्या संशोधनात चिनी अंतराळवीरांनी तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर तांदूळ (Rice) आणि भाज्या (Vegetables) पिकवल्याचं सांगितलं आहे. या पिकांच्या पूर्ण विकासासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस या पिकांची रोपे पृथ्वीवर (Earth) आणली जातील.
माहिती देताना, चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्स (CAS) ने सांगितले की, या वर्षी 29 जुलै रोजी थल क्रेस आणि तांदूळ या दोन प्रकारच्या वनस्पतींच्या बिया एक प्रयोग म्हणून उगवल्या गेल्या. या बिया टेम्पररी स्पेस स्टेशन तिआंगॉन्ग येथे उगवल्य गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या एका महिन्यात या प्रयोगाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाताच्या बिया 30 सेंमी पर्यंत वाढल्या आहेत. CAS च्या मते, थाल क्रेस हा रेपसीड, कोबी सारख्या अनेक हिरव्या पालेभाज्यांचा प्रातिनिधिक नमुना आहे. यामध्येही बरीच वाढ झाली आहे.
CAS सेंटर फॉर एक्सलन्स इन मॉलिक्युलर प्लांट सायन्सेसचे संशोधक झेंग हुइकिओंग यांनी SCAP न्यूजला सांगितले की, हे दोन प्रयोग अंतराळातील प्रत्येक वनस्पतीच्या जीवनचक्राचे विश्लेषण करतील आणि वनस्पती सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाचा वापर वाढ आणि उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यासाठी कशा करू शकतात हे शोधून काढतील. पृथ्वीसारख्या परिस्थितीची नक्कल करणार्या कृत्रिम वातावरणातच पिके घेतली जाऊ शकतात.
CAS च्या मते, या वनस्पतींमध्ये आधीच बरीच वाढ झाली आहे आणि काही शिल्लक आहे. जे काही महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांना पृथ्वीवर आणले जाईल. अहवालानुसार, या पिकांची रोपे यावर्षी डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणली जातील. चीन आपल्या जमिनीवर या वनस्पती वाढविण्याच्या विचारात आहे.