China : नवी दिल्ली : कोरोना व्हायरस काही केल्या चीनची पाठ सोडायला तयार नाही. आता जगभरात या घातक आजाराचा प्रसार नियंत्रणात आलेला असताना चीनमध्ये मात्र उद्रेक वाढला आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 11 हजार 773 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी 10 हजार 351 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रकरणांचा समावेश आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली. चीनमध्ये गेल्या आठवडाभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ ही ‘झिरो कोविड’ रणनीतीसमोर आव्हान निर्माण करत आहे ज्या अंतर्गत प्रत्येक संक्रमित व्यक्तीला विलगीकरणात ठेवायचे आहे.
शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या नियंत्रण उपायांनुसार देशात येणाऱ्या लोकांसाठी चीन विलग ठेवण्याचा कालावधी सात दिवसांवरून पाच दिवसांवर आणेल. अशा व्यक्तींना होणारा खर्च आणि त्रास दूर करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. तथापि, कम्युनिस्ट पक्षाने सांगितले की ते ‘झिरो कोविड’ धोरणाची अंमलबजावणी सुरुच राहील.
नॅशनल हेल्थ कमिशननुसार, 1.3 कोटी लोकसंख्येचे शहर असलेल्या ग्वांगझूमध्ये कोविड-19 चे 3 हजार 775 प्रकरणे समोर आली ज्यामध्ये 2 हजार 996 लक्षणे नसलेल्या प्रकरणांचा समावेश आहे. ग्वांगझूच्या हाइजू जिल्ह्यातील लोकांना जवळच्या चाचणी केंद्रावर जाण्यास किंवा घरीच राहण्यास सांगण्यात आले जेणेकरुन त्यांची COVID-19 ची चाचणी करता येईल. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही घोषणा केली आहे. प्रत्येक घरातील एका सदस्याला अन्न खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आजाराने येथील लोक हैराण झाले आहेत. चीन सरकारच्या कठोर झिरो कोविड धोरणाचाही त्यांना त्रास होत आहे. मात्र, तेथील नागरिकांना सरकारविरोधात फारसे बोलता येत नाही. त्यामुळे येथे चीन सरकार मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याची टीका जगभरातून नेहमीच होत असते.
- हे वाचा : Coronavirus In China : बाब्बो.. ‘या’ शहरांत पुन्हा लॉकडाऊन; ‘इतक्या’ लोकांची होणार तपासणी; जाणून घ्या..
- Corona In China : अर्र.. चीनमध्ये पुन्हा कोरोना रिटर्न; पहा, चीनी सरकारने काय काय केले बंद ?